Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीन काहीसे नरमले; कापूस, सोयाबीन, टोमॅटो तसेच हळद दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हळद, टोमॅटो आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापूस बाजारभाव गेल्या दोन महिन्यांपासून दबावातच आहे. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात ७१.१७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. वायदे सतत ७० ते ७३ सेंटच्या आसपास दिसून येत आहेत. देशातील बाजारातही वायदे ५६ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. कापूस बाजारातील आवकही जून महिन्यात कमी झाली. पण तरीही कापसाचा भाव ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहीला. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज आहे. 

सोयाबीनची बाजारातील आवक कमी झाली आहे. मात्र तरीही खाद्यतेल आयात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा दबाव कायम आहे. अनेक शेतकऱ्यांनी आजही सोयाबीनचा स्टाॅक मागे ठेवला आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी ५ हजारांपेक्षा अधिकच्या भावाची अपेक्षा आहे. पण देशातील बाजारात सोयाबीन ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे ११.८५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोला सध्या चांगला भाव मिळत आहे. बाजारातील घटलेली आवक आणि चांगल्या उठामुळे टोमॅटो सध्या भाव खात आहे. पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा पिकाला फटका बसला. त्यातच यंदा कमी पावसामुळे लागवडीही कमी होत्या. यामुळे आवक कमी दिसत आहे. परिणामी टोमॅटोच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. टोमॅटोचा बाजार सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. यापुढच्या काळात आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

डाळिंबाचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत. डाळींब पिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. डाळिंबाचा उचांकी भाव काही ठिकाणी १५ हजार ते काही ठिकाणी २५ हजार रुपये दिसत आहे. पण डाळिंबाला सध्या सरासरी ८ हजार ते १० हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे. ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT