Chana Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : बाजारात हरभऱ्याची आवक वाढतेय

Market Update : हरभरा भावात काहीशी नरमाई आली. सध्या हरभऱ्याला ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात कालपासून सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात वाढ झाली आहे. सोयाबीनचा भाव आज दुपारपर्यंत सव्वा दोन टक्क्यांनी वाढून ११.७४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते.

तर सोयातेलही दोन टक्क्यानी वाढले होते. सोयापेंड वाढून ३३५ डाॅलरवर होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीन आणि सोयापेंडच स्थिर होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणेसह पुढील काळात देशातही सोयाबीनचे भाव वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस बाजारातील सुधारणा कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये आणि प्रत्यक्ष कापूस खरेदी भावात सुधारणा दिसून आली. देशातील बाजारातही कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत असून याचा आधार कापूस भावाला मिळत आहे.

सध्या देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भावातील सुधारणाही कायम राहण्याचा अंदाज असून देशातही याचे सकारात्मक पडसाद उमटतील, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते. बाजारात ज्वारीची आवक वाढली आहे. रब्बीतील ज्वारी बाजारात येत असल्याने पुरवठा वाढलेला दिसतो. पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून येत आहे.

त्यामुळे हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते. सध्या ज्वारीला ३ हजार ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात सध्या हरभऱ्याचे भाव टिकून आहेत. सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक सुरु झाली. पुढच्या काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल.

त्यातच सरकारच्या भारत ब्रॅन्ड डाळीची विक्री, सरकारच्या धोरणामुळे उद्योग आणि स्टाॅकीस्टची हात आखडून सुरु असलेली खरेदी, यामुळे हरभरा भावात काहीशी नरमाई आली. सध्या हरभऱ्याला ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय. हा भाव पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याचे भाव टिकून आहेत. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT