Sugar Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : साखरेच्या दरात सुधारणा ; जाणून घ्या आजचे कापूस, सोयाबीनचे बाजारभाव

Sugar Market : देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांचे गाळप लवकर संपत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कारखाने बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे.

अनिल जाधव

साखरेच्या दरात सुधारणा

देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांचे गाळप लवकर संपत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कारखाने बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सर्वच संस्थांनी यंदा देशातील साखर उत्पादनात १९ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे अंदाज दिले आहेत. साखरेच्या दरात मागील दोन महिन्यांमध्ये १५ टक्क्यांपर्यंत झाली आहे. तस सध्या बाजारात साखर ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयाने विकली जात आहे. साखरेच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

हळदीची आवक वाढली

देशातील बाजारात हळदीची आवक वाढत आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणात हळदीची आवक चांगली आहे. त्यातही तेलंगणाचा हंगाम शिगेला पोचला. त्यामुळे दरपातळीही दबावात आली आहे. तेलंगणाच्या अनेक बाजारात हळदीचे भाव १० हजारांच्या खाली आले आहेत. तर महाराष्ट्रात हळदीचा भाव १० हजार ते ११ हजारांच्या दरम्यान दिसत आहे. हळदीला सध्या मागणीही चांगली आहे. राज्यातील हळदीची आवक यापुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हळदीच्या दरावर काहीसा दबाव येऊ शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कलिंगडाला मागणी

उन्हाचा चटका वाढत असल्याने कलिंगडालाही मागणी वाढली आहे. दुसरीकडे बाजारातील आवकही चांगली आहे. अनेक भागात कलिंगड प्लाॅट्सची काढणी वेगाने सुरु आहे. हा माल विक्रीसाठी बाजारात येतोय. सध्या कलिंगडाला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ११०० रुपये भाव मिळत आहे. कलिंगडाची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल. त्यामुळे दरातही वाढ होईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

सोयाबीन दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे १०.१६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंड ३०६ डाॅलर प्रतिटनांवर बंद झाले. देशात प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार २०० ते ४ हजार २५० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची बाजारातील आवक स्थिर आहे. सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस बाजार स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होऊन वायदे ६७.३७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान बंद झाले होते. देशातील बाजारात कापसाची आवक कमी होत आहे. बाजारात कापसाची विक्री ६ हजार ८०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान झाली. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार मागील आठवडाभर पाहायला मिळाले. बाजारातील कापसाची आवक मार्चनंतर कमी होत जाईल. त्यामुळे दरातही काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT