Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: सोयाबीन भाव दबावातच; हरभरा, बेदाणा, कापूस तसेच काय आहेत सोयाबीन भाव?

Daily Commodity Market: सध्या कृषी बाजारात सोयाबीनचे दर दबावात आहेत, तर हरभरा, बेदाणा आणि कापसाच्या किमती स्थिर आहेत की वाढत आहेत? जाणून घ्या शेतीमाल बाजारातील ताजे अपडेट.

Anil Jadhao 

Market Bulletin:

हरभरा दर स्थिर

सरकारने पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही. पिवळा वाटाणा आयातीवर ५० टक्के शुल्क आणि २०० रुपये किमान आयात मूल्य लागू आहे. मात्र सरकार या धोरणात लवकरच बदल करू शकते, याची शक्यता असल्याने हरभरा बाजारात मोठी सुधारणा न होता दर स्थिर होते. आज बाजारात ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला. बाजारात पुढील दोन महीने आवकेचा दबाव राहणार आहे. त्यामुळे हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बेदाणा दर टिकून

लग्नसराई आणि सण समारंभामुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे. अजूनही बाजारातील बेदाणा आक मर्यादीत आहे. यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्षटंचाई भासली. त्यामुळे बेदाणा निर्मिती संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात झालेली वाढ टिकून आहे. नव्या बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २५० रुपये दर मिळत आहे. त्यातच रमजान ईद, होळी सणानिमित्त देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज बेदणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


गवारचे भाव टिकून

बाजारातील गवारची आवक कमीच आहे. तर गवारला चांगला उठाव आहे. त्यामुळे गवारचे भावही टिकून आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादीत दिसत आहे. इतर भाजीपाल्याची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखून आहे. बाजारातील आवक आवक आजही कमीच होती. त्यामुळे बाजारात गवारला ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच काहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज आहे. 

सोयाबीनमध्ये नरमाई

देशात सोयाबीनचा बाजार दबावातच आहे. सोयाबीनचा भाव बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल ३ हजार ७०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान आज भाव मिळाला. तर सोयापेंडचा भाव सरासरी २७ हजार ते २८ हजार रुपयांच्या दरम्यान आजही स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात शुक्रवारच्या तुलनेत काहीशी वाढ झाली होती. बाजारातील सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र सोयाबीनच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस दबावातच 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसातील मंदी आणि देशातील स्थिर उठाव याचा परिणाम दरावर दिसत आहे. कापूस आज सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला गेला. देशातील बाजारात कापसाची आवक सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान कायम आहे. बाजारातील आवक चालू महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आता शेतकऱ्यांकडील कापसाचा स्टाॅकही कमी होत आहे. याचा परिणाम आवकेवर दिसेल. पुढच्या काळात बाजारातील कमी आवक कमी होण्याबरोबर दरात काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT