Cotton, Soybean Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, मका बाजार, कांदा दर

Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७६.१५ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते.

Anil Jadhao 

Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे शुक्रवारी काही प्रमाणात कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७६.१५ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५७ हजार ५२० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी काही ठिकाणी आज काहीशी नरमली होती. पण सरासरी भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांवर होती. कापूस बाजारतील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई दिसून आली होती. सोयाबीनचे वायदे १२.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ३६७ डाॅलरवर होते. देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. सोयाबीनचा बाजार गेल्या काही आठवड्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता. ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर उत्पादकता कमी राहील्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पण बाजारातील आवक वाढल्याने २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

राज्यातील अनेक बाजारांमधील कांद्याची सरासरी आवक कमी दिसत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. पण आजही अनेक बाजारात कांद्याचा किमान भाव ५०० रुपयांपेक्षाही कमी मिळत आहे. तर चांगल्या कांद्याचा भाव २ हजारांच्या दरम्यान दिसतो. पण सरासरी दरपातळी की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो भाव १३०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे, यापुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

तुरीची भावपातळी मागील काही आठवड्यांपासून टिकून आहे. तुरीला उठाव मिळत असल्याने भावाला आधार आहे. काही आठवड्यांपुर्वी तुरीच्या भावात आलेली काहीसे नरमाई दूर झाल्याचे दिसत आहे. देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT