Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मक्यामध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन, टोमॅटो तसेच काय आहेत गहू दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, मका आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमधील सुधारणा कायम

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे. आज दुपारपर्यंत सोयाबीन बाजार कालच्या तुलनेत सुधारला होता. दुपारपर्यंत सोयाबीनचा भाव ९.८४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. सोयातेल आणि सोयापेंडचा भाव मात्र स्थिर होता. सोयातेलाचा बाजार ४०.७१ सेंट प्रतिपाऊंवर होता. सोयापेंडचा भाव ३०७ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातही सोयाबीनचा भाव काहीसा सुधारला. प्रक्रिया प्लांट्सचा खरेदीचा भाव ४५०० ते ४६०० रुपयांच्या दरम्यान खरेदी सुरु होती. तर बाजार समित्यांमध्ये भाव सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसामध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात आज पुन्हा काहीशी नरमाई दिसून आली. तर देशात कापूस स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे पुन्हा एकदा ७० सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमी पातळीवर होते. दुपारपर्यंत कापूस ७०.०४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार १०० रुपये प्रतिखंडीवर कायम होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम दिसली. बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारात पुढच्या काळात सुधारणेचे संकेत दिसत आहेत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटो बाजार स्थिरावला

टोमॅटोच्या भावात चढ उतार सुरु आहेत. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव दिसत आहे. आजही टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये २ हजारांपेक्षा कमी दिसत आहे. तर जास्त आवक असलेल्या बाजारातील सरासरी भाव यापेक्षा कमी आहे. सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ५०० ते २  हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

गव्हाचा बाजार स्थिर

केंद्र सरकारने गव्हाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी स्टाॅक लिमिट, बाजारात गव्हाची आणि पिठाची विक्री केल्यानंतर दरावर काहीसा दबाव आला. परिणामी गव्हाचे भाव उच्चांकावरून कमी होऊन स्थिरावले आहेत. आजही गव्हाला बाजारात सरासरी २ हजार ६०० ते २ हजार ८०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील गव्हाची आवक कमी झालेली आहे. दुसरीकडे निर्यातबंदी कायम आहे. त्यामुळे बाजारावर दबाव. सरकारच्या धोरणांमुळे गव्हाचा बाजार आणखी काही महीने कायम राहू शकतो, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

मक्याचे भाव टिकून

देशातील बाजारात मक्याचा भाव टिकून आहे. देशात यंदा मक्याला चांगला उठाव आहे. इथेनाॅल उद्योग यंदा मक्याचा वापर वाढविणार आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मक्याचा भाव टिकून आहे. मक्याला सध्या सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रावर ३ हजार रुपये भाव मिळाला. मक्याचा भाव तेजीतच राहतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT