Cotton Market
Cotton Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton Market Rate : देशात कापूस दरात आज काहीशी सुधारणा

Team Agrowon

१) सोयाबीन दरात सुधारणा (Soybean Rate)

देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातहीआज सोयाबीन (Soybean Rate) दरात सुधारणा पाहायला मिळाली. आज दुपारपर्यंत सोयाबीन वायदे १५.४२ सेंट प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या (Soymeal) वायद्यांमध्येही सुधारणा होऊन वायदे ४९८ डाॅलरवर पोचले.

देशातील बाजारातही सोयाबीन दरात क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसली. सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांवर पोचली. सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्यास अनुकूल स्थिती आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

२) हिरवी मिरची तेजीत

सध्या बाजारात हिरव्या मिरचीचे दर तेजीत आहेत. बाजारातील मिरचीची आवक नगण्य पातळीवर आहे. सध्या पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक बाजारांमध्ये मिरचीची आवक काहिशी अधिक दिसते. मात्र सरासरीपेक्षा आवक कमीच आहे.

इतर बाजारांमध्ये १० क्विंटलच्या दरम्यान आवक आहे. त्यामुळं मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही दिवस हिरव्या मिरचीचे दर तेजीत राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) कलिंगडाला कमी उठाव

दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यामुळं फळांना मागणी वाढत आहे. कलिंगडाची बाजारातील आवकही वाढली आहे. पण सध्या तापमानात चढ उतार होत आहेत. रात्री थंडी आणि दुपारी उन असते. त्यामुळं कलिंगडाला काहिसा कमी उठाव मिळत आहे.

पण एकदा उन वाढल्यानंतर कलिंगडलाही उठाव वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या कलिंगडाला सरासरी ७०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

४) ज्वारी खातेय भाव

देशातील बाजारात सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. यंदा खरिपातील ज्वारीचे उत्पादन घटले. तर रब्बीतही लागवडही कमी झाली. सध्या बाजारात आवकही मर्यादीत होत आहे. पण ज्वारीला उठाव चांगला आहे. त्यामुळं ज्वारीचे दर तेजीत आहेत.

सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर यंदा टिकून राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

५) कापसाला पुढील १५ दिवसांनंतर काय भाव मिळू शकतो? (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही आज कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. सध्या बाजारातील आवक काहीशी सुधारलेली आहे. त्यातच शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागे ठेवला. तर देशातील उत्पादनही कमी झाले. सध्या देशातून कापूस निर्यातही सुरु झाली.

त्यामुळं कापूस बाजार मजबूत स्थितीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे. सोमवारी कापूस बाजारभाव तसचं वायदेही कमी झाले होते. पण आज कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे दुपारी २ वाजेपर्यंत एक टक्क्याने वाढून ८२.६० सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर प्रत्यक्ष खरेदीचे दर म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स काहीसा कमी होऊन ९७.३५ सेंट प्रतिपाऊंडवर होता.

आज देशातील काही बाजारांमध्येही कापूस दरात सुधारणा झाली होती. कापूस दर क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत वाढले होते. बाजारात आज कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

यंदा कापसाचे दर चांगले राहण्यास अनुकूल स्थिती आहे. पुढील १० ते १५ दिवस कापूस बाजारावर दबाव राहू शकतो. मात्र त्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते.

कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोहचू शकते. तर हंगामातील सरासरी दर ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT