Onion Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : अनेक बाजारात निर्यातबंदीनंतर भाव निम्म्यावर

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात नरमाई आली होती. कालच्या वाढीनंतर बाजार टिकला नाही आणि आज वायदे जवळपास एक टक्क्याने कमी झाले. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १३.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड दोन टक्क्याने कमी होऊन ४०३ डाॅलरपर्यंत कमी झाले.

देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली. प्रक्रिया प्लांट्सनी भाव २५ ते ५० रुपयांनी कमी केले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस १०० रुपयांपर्यंतचे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज काहीसे वाढून ८१.२२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे खंडीमागे १६० रुपयांनी कमी झाले होते. देशातील वायदे आज ५६ हजार ५६० रुपये प्रतिखंडीवर होते.

बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र जागचे हालण्याचे नाव घेईना. बाजार समित्यांमध्ये कापसाचे व्यवहार आजही ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाची ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये कांद्याचे भाव आजही क्विंटलमागे सरासरी २०० रुपयांनी कमी झाले. काही बाजारांमधील आवक जास्त झाली होती. कांद्याला आज सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपये भाव मिळाला. निर्यातबंदीचा परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लाल कांद्याची बाजारातील आवक जास्त असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

निर्यातबंदीमुळे भाव कोसळल्याने शेतकरी निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करत आहेत. अनेक बाजारांमध्ये कांद्याचे भाव जवळपास निम्मे कमी झाले. लाल कांद्याची टिकवणक्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे.

टोमॅटोच्या भावाता मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचे दिसते. बाजारातील टोमॅटो आवक वाढली आहे. त्यामुळे भावावर काहिसा दबाव आला. सध्या बाजारात टोमॅटोला गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. टोमॅटोचा भाव काही बाजारात एक हजार रुपयांपासून सुरु झाला.

तर सरासरी भाव २ हजार ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोची वाढलेली आवक आणि सरकारच्या धोरणांचा दबाव बाजारावर आहे. बाजारातील आवक जास्त आहे तोपर्यंत टोमॅटो दरावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने गव्हचे स्टाक लिमिट म्हणजेच साठा मर्यादा कमी केल्यानंतर गव्हाच्या बाजारावर याचा परिणाम दिसून आला. गव्हाचे भाव अनेक बाजारात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. सध्या गव्हाचा भाव सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. आतापर्यंत गव्हाची लागवड गेल्यावर्षीच्या लागवडीच्या तुलनेत सव्वादोन टक्क्याने पिछाडीवर आहे.

त्यातच पिकासाठी पुढील काळात वातावरण कसे राहते, यावर उत्पादन अवलंबून असेल. त्यामुळे गव्हाच्या भावावर सध्या आलेला दबाव जास्त दिवस दिसणार नाही, असा अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT