Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : ज्वारीचा बाजार दबावातच; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत लसूण दर ?

Agriculture Commodity Market : सोयाबीनच्या बाजारभावातील चढ उतार कायम आहेत. आवक जास्त असल्याने दर मात्र दबावातच आहेत. हमीभावाने सोयाबीन खरेदीची गतीही खूपच कमी आहे. खरेदी केंद्रेही कमी आहेत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन दबावातच

सोयाबीनच्या बाजारभावातील चढ उतार कायम आहेत. आवक जास्त असल्याने दर मात्र दबावातच आहेत. हमीभावाने सोयाबीन खरेदीची गतीही खूपच कमी आहे. खरेदी केंद्रेही कमी आहेत.

तर खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. आज सोयाबीन ९.९० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिर

कापसाच्या भावात दोन दिवसांपासून पुन्हा चढ उतार सुरु झाले. पुढे सुताला उठाव कमी असल्याची चर्चा बाजारात सुरु झाली आणि कापसाच्या भावात पुन्हा चढ उतार सुरु झाले. बाजारातील आवकही वाढली.

रोज जवळपास १ लाख ८० ते १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान बाजारात आवक होत आहे. मात्र बाजार टिकून आहे. देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

लसूण तेजीतच

लसणाचे बाजारभाव तेजीतच आहेत. देशातील बाजारात लसणाची आवक कमी आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. देशातील अनेक भागात लसणाची लागवड सुरु झाली. हा लसून बाजारात येण्याला उशीर होईल.

दर वाढले तरी लसणाला मागणी टिकून आहे. त्यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे. लसणाला घाऊक बाजारात २५ हजार ते ३० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारी दबावातच

राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावातच आहेत. खरिपातील ज्वारी बाजारात दाखल झाल्यानंतर ज्वारीच्या भावावर दबाव वाढला होता. यंदा खरिपातील ज्वारीचे उत्पादन वाढल्याचे आवकेवरून दिसत आहे. त्याचा दबाव बाजारावर असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार प्रतिक्विंटल सरासरी २ हजार १०० ते २ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. यंदा रब्बी ज्वारीचाही पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा दबाव ज्वारीच्या भावावर येण्याची शक्यता आहे.

मक्याच्या दरात काहिशी सुधारणा

बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे. तर दुसरीकडे मक्यामधील ओलावा कमी झाला. त्यामुळे मक्याच्या भावात मागील ८ दिवसांच्या काहिशी सुधारणा दिसून येत आहे. मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या २ हजार १०० ते २ हजार २०० रुपये दिसून येत आहे. मात्र ओलावा अधिक असलेल्या मालाला आजही कमी भाव मिळत आहे.

त्यामुळे किमान भावपातळी आजही १८०० रुपये दिसत आहे. यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचे बाजारभाव टिकून राहतील, असा अंदाज मका बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT