Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा बाजार स्थिरावला; कापूस, सोयाबीन, हरभरा, तसेच कारले दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, लसूण, कांदा आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

कापूस वायदे नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे मागील चार दिवसांपासून ७० सेंटपेक्षा कमी पातळीवर कायम आहेत. कापसाचे वायदे आजही ४ वर्षातील निचांकी पातळीवर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ६८.१३ सेंट प्रतिपाऊंडवर आले. देशातील बाजारातही जुलैचे वायदे ५५ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन बाजार दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.१७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला आजही ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लसणाचे भाव तेजीतच

राज्यात लसणाचे भाव तेजीतच आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. महत्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील उत्पादक भागात यंदा कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाच लसूण पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन कमी राहून पुरवठा घटला आहे.सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

कांदा भाव स्थिरावले

कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पुर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे. बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली. पण कांद्याचा उठाव कायम आहे. त्यामुळे कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

हळदीचा बाजार नरमला

हळदीच्या भावात मागील काही आठवड्यांपासून काहीशी नरमाई आली आहे. हळदीचा सरासरी भाव ३ हजारांना कमी झालेला आहे. नव्या हंगामातील वाढती हळदीची लागवड आणि स्थिर मागणी यामुळे सध्या हळदीचे भाव काहीसे कमी झाले. सध्या हळदीला सरासरी १३ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीच्या भावातील नरमाई आणखी काही आठवडे राहू शकते. हळदीच्या भावात काहीसे चढ उतारही राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT