Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: मुगाचा बाजारभाव दबावातच! जाणून घ्या कारली, मका, कापूस आणि सोयाबीनचे दर?

Daily Commodity Rates: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारभाव माहिती! सध्या मुगाच्या किमती दबावात आहेत, तर कारली, मका, कापूस आणि सोयाबीनच्या दरांमध्ये काही बदल झाले आहेत. जाणून घ्या आजचे ताजे बाजारभाव!

Anil Jadhao 

Market Bulletin:

मुगाचा बाजार दबावात

देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे. देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कारल्याला चांगला उठाव

राज्यातील बाजारात कारल्याची आवक सुधारली आहे. कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. मात्र बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून आला. कारल्याचे भाव मागील आठवडाभरापासून काहीसे कमी झाले. आठवडाभरात कारल्याचे भाव क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान कमी झाले. सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत. कारल्याची आवक आणखी काही दिवस कायम राहील, असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत.

मक्याचा भाव स्थिर

देशात मक्याला यंदा चांगली मागणी आहे. इथेनाॅल, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांकडून चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील आवकही स्थिर आहे. देशात मक्याचा स्टाॅकही चांगला आहे. रब्बीतील मक्याची लगावडही वाढली आहे. या कारणांनी बाजार मागील दोन महिन्यांपासून एका दरपातळीच्या दरम्यान दिसत आहे. आजही मक्याला सरासरी २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मक्याच्या भावात पुढील दोन -तीन आठवडे काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन नरमले

अमेरिकेने चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांच्या आयातीवर लावलेले शुल्क या देशांनी त्याला शुल्क वाढीने दिलेले प्रत्यूत्तर यामुळे जागतिक कमोडिटी बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी दरपातळी स्थिर दिसत आहे. देशात मात्र नाफेडच्या विक्रीच्या बातमीने बाजारावर परिणाम झाला. अनेक बाजारात सोयाबीन २०० रुपयांनी कमी झाले होते. सोयाबीन आज बाजारात ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. नाफेडच्या विक्रीत स्पष्टता आल्यानंतर बाजारावर त्याचा परिणाम दिसेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसातील मंदी आणि देशातील स्थिर उठाव याचा परिणाम दरावर दिसत आहे. कापूस वायदे आणि बाजार समित्यांमध्ये काहीशी नरमाई आली. कापूस आज सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला गेला. देशातील बाजारात कापसाची आवक सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान कायम आहे. बाजारातील आवक चालू महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देशातील बाजारावरही होऊ शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखान्यांकडे मागणी

FFS Fertilizer Booking System: खत ‘ऑनलाइन बुकिंग’ला नऊ जिल्ह्यांमध्ये सुरुवात

Farm Loan Waiver Lists: दर पंधरा दिवसांनी कर्जमाफीच्या याद्या येणार: मुख्यमंत्री फडणवीस

Wheat Export Ban Lifts: केंद्र सरकारने गहू निर्यातीवरील बंदी उठविली

Pune Rain: घाटमाथ्यावर तुरळक सरी

SCROLL FOR NEXT