Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: गाजराचे बाजारभाव टिकून; तीळ, पपई, काकडी तसेच काय आहेत सोयाबीन भाव?

Daily Commodity Rates: आज आपण तीळ, गाजर, पपई, काकडी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

तिळाला चांगला उठाव

बाजारातील वाढत्या आवकेबरबोर तिळाच्या भावातही नरमाई दिसून आली. तिळाला देशातील बहुतांशी बाजारात चांगला उठाव आहे. असे असतानाही आवकेच्या दबावाबरोबर दरावरही दबाव दिसून येत आहे. बाजारात सध्या तिळाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत. बाजारातील तिळाची आवक पुढील काही आवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात सुधारणाही होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

गाजराला मागणी

गाजराला बाजारात चांगला उठाव आहे. तसेच गाजराची आवकही चांगली सुरु आहे. त्यामुळे गाजराचे भाव कमी झाले तरी टिकून दिसत आहेत. राज्यातील बाजारात गाजराची आवक सरासरीच्या पातळीवर सुरु आहे. त्यामुळे सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांचा भाव मिळत आहे. गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तसेच गाजराला उठावही कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही आठवडे गाजराचा बाजार स्थिर दिसू शकतो, असा असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पपईच्या दरावर दबाव

राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. मात्र बाजारातील आवक काहीशी वाढली आहे. याचा दबाव दरावर आला. पपईच्या भावात काहीसे चढ उतार दिसत आहेत. पपईचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत. पपईला सध्या १२०० ते १६०० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती. मात्र आवक वाढल्याचा परिणाम दिसत आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील पपईची आवक कमी होऊन दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

काकडीचा बाजार टिकून

सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे. दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरु आहे. मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या १ हजार १०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील. त्यानंतर आवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सोयाबीन दर टिकून

बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी झाली. त्यामुळे दरात सुधारणा होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र नाफेडची विक्री आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार, याचा दरावर दबाव दिसत आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार ४५० ते ४५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. नाफेडची विक्री ४ हजार ३०० ते ४ हजार ३५० रुपयाने होत आहे. सोयाबीनची आवक पुढच्या काळात कमी होणार आहे. मात्र नाफेडच्या विक्रीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा दबाव राहील, असे अभ्यासकांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT