Agriculture Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: गव्हाचा बाजारभाव टिकून; तूर, आले, कोबी तसेच काय आहेत आजचे कापूस भाव?

Daily Commodity Rates: आज आपण गहू, तूर, आले, कोबी आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

गव्हाचा भाव टिकून

बाजारात सध्या गव्हाची आवक चांगली सुरु आहे. पण सरकार हमीभावाने खरेदी करत आहे. मध्य प्रदेश बोनसही देत आहे. तर दुसरीकडे गहू उत्पादनात अपेक्षित वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गहू दराला आधार आहे. एप्रिलपासून बाजारातील आवक वाढल्यानंतरही गव्हाचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. सध्या गहू २ हजार ५०० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. मे महिन्यात बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाच्या भावातही वाढ होऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचा भाव नरमला

वाढती आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढ उतार सुरु आहेत. तुरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली होती. तुरीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीची बाजारातील आवक मे महिन्यात कमी होणार आहे. मात्र आयातीचा दरावर काहीसा दबाव राहील. त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसू शकतात. सरासरी दरपातळीत काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज तूर बाजारातली अभ्यासकांनी व्यक्त केला.

आले दरात सुधारणा

बाजारातील आल्याची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी दिसत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईमुळे आल्याला उठाव आहे. याचा आधार आल्याच्या भावाला मिळत आहे. मागील दोन आठवड्यांपासून आल्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली. आल्याचे भाव सध्या ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. सध्या आल्याला उठाव आहे. तसेच पुढील काळात बाजारातील आवकही कमी होणार आहे. त्यामुळे आल्याच्या भावात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कोबीचे दर दबावात

बाजारात कोबीची आवक चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादीत दिसत आहे. याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे. कोबीचे दर मागील काही आठवड्यापासून दबावातच दिसत आहेत. वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कोबी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

कापूस दरात सुधारणा

कापसाची बाजारातील आवक कमी झाली. सीसीआयची कापूस विक्री सुरु आहे. मात्र सीसीआयच्या कापूस विक्रीचे दर बाजारभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे बाजारात कापसाच्या भावाला आधार मिळत आहे. तसेच कापसाला उठाव आहे. देशातून सूत आणि कापडाची निर्यातही सुरु आहे. यामुळे कापूस दरालाही आधार मिळाला. सध्या कापूस ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. यापुढील काळात बाजारातील कापसाची आवक कमी होणार आहे. त्यामुळे सीसीआयच्या विक्रीचा दरावर परिणाम दिसून येईल, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT