Tur Market
Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Market: देशातील तूर उत्पादनात किती घट होणार ?

Team Agrowon

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढत आहे. तर दुसरीकडे तुरीची आयातही (Tur Import) वेगाने होत आहे. मात्र सध्या तरी तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. पण हे दर टिकतील का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मग यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीचे उत्पादन यंदा वाढणार की घटणार? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. सोयाबीन बाजार स्थिर


अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीने जगातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज कायम ठेवला. अर्जेंटीना आणि ब्राझीलमधील दुष्काळी स्थितीमुळे मागील काही दिवसांपासून युएसडीए या देशांमधील उत्पादनाचा अंदाज कमी करेल, अशी शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. त्यातच आज पामतेलाचे दरही काहीसे नरमले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन दर काहीसे नरमले होते. मात्र देशात सोयाबीन दर कायम होते. आज सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
 

2. कापूस दर टिकून

जागतिक कापूस उत्पादनात यंदा घट होण्याचा अंदाज आहे. मात्र अनेक देशांतील कापडाची मागणी वाढलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ-उतार कायम आहेत. आजही कापसाचे दर काहीसे कमी होऊन ८०.३५ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील काही बाजारांमध्ये दरात सुधारणा झाली होती. मात्र अनेक ठिकाणी दर स्थिर होते. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळाला. चालू महिन्यात कापसाच्या बाजारात चढ-उतार राहण्याचा अंदाज आहे, तर पुढील महिन्यात दर सुधारू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

3. काबुली हरभरा तेजीतच


सध्या काबुली हरभऱ्याचा बाजार तेजीत आहे. काबुली हरभऱ्याला सध्या १२ हजार ते १३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. देशातील लग्नसराईचे दिवस सुरु झाले. त्यातच निर्यातीसाठीही काबुली हरभऱ्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. बाजारातील अभ्यासकांच्या मते, चालू आठवड्यात काबुली हरभरा दरात क्विंटमागे १०० ते २०० रुपयांची तेजी-मंदी राहू शकते. मात्र दीर्घकालीन कल पाहता काबुली हरभऱ्याचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज आहे.

 4. गहू दराची घोडदौड सुरुच

देशातील बाजारांत गहू दरातील वाढ आजही कायम होती. आज महत्वाच्या घाऊक बाजारांमध्ये गहू दराने प्रतिक्विंटल २ हजार ७०० हजार ते ३ हजार २०० रुपयांचा टप्पा गाठलाय.  देशातील गहू पेरणी सध्या वाढत आहे. मात्र चालू हंगामातील गहू बाजारात येण्यास मोठा कालावधी लागेल. तोपर्यंत देशातील मर्यादीत पुरवठ्यावरच गरज भागवावी लागेल. म्हणजेच गव्हाच्या दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज गहू बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
 

5. देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र सध्यातरी तुरीचे दर तेजीत आहे. पण हे दर टिकतील का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. तर जाणकारांच्या मते आयात वाढली तरी, तुरीचे दर तेजीत राहतील. कारण यंदा देशातील तूर उत्पादनात घट होणार आहे. देशात तुरीची लागवड जवळपास साडेचार टक्क्यांनी कमी राहिली. त्यातच सुरुवातीपासूनच तुरीचे पीक संकटाच्या गर्तेत सापडले. जून आणि जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने लागवडी उशिरा झाल्या. त्यातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महत्वाच्या तूर उत्पादक भागांमध्ये सलग जोरदार पाऊस झाले. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले. तसेच नोव्हेंबर महिन्यातही सलग १५ ते २० दिवस पाऊस होता. त्यामुळे फुलोऱ्यातील तुरीचे फूल गळून पडले. आता तूर शेंगा दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र पिकाला आवश्यक थंडी नाही. यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहिले. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतोय. तर फूलगळही वाढली. या सर्व घटनाक्रमामुळे यंदा तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास २५ ते ३० टक्के कमी राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील. मात्र यंदा तुरीची दरपातळी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहील, असा अदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT