Tur Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीच्या भावावर दबाव कधीपर्यंत राहील?

Market Update : तुरीच्या भावात क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांची नरमाई दिसून आली. सध्या तुरीचे भाव ८ हजार ३०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.

Anil Jadhao 

Share Market Bulletin : देशातील काही बाजारात तुरीच्या भावात काहीशी नरमाई दिसून आली. त्याचे महत्वाचे कारण आहे बाजारात आवक वाढण्याचा अंदाज. सध्या कर्नाटकातील  बाजारात तुरीची आवक वाढली आहे. संक्रांतीनंतर देशातील इतरही बाजारात तुरीचे भाव वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याचा परिणाम भावावर दिसून येत आहे. त्यामुळे तुरीच्या भावात क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांची नरमाई दिसून आली. सध्या तुरीचे भाव ८ हजार ३०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. पण तुरीला यंदा घटलेले उत्पादन, स्टाॅकीस्टची खरेदी आणि सरकारची बाजारभावाने खेरदीचा आधार आहे. त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील नरमाई कायम आहे. सोयाबीन आजही १२.२६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड आजही ३६२ डाॅलरवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन भावावर सध्या पुरठ्याच्या अंदाजामुळे दबाव आहे. देशातील सोयाबीनचे भाव आजही ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांवर आहेत.

सोयाबीनच्या भावात आलेली नरमाई कायम असल्याने शेतकरी पॅनिक सेलिंग करतानाही दिसत आहेत. याचा दबाव बाजारावर येताना दिसत आहे. सोयाबीन बाजारातील आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसून येऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील कापसाचे भाव कायम आहेत. बाजारातील होणारी आवक कायम आहे. आजही देशातील बाजारात जवळपास १ लाख ८० हजार गाठींची कापूस आवक झाली होती. त्यापैकी सर्वाधिक आवक तेलंगणात झाली होती. तेलंगणात सीसीआयची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

यामुळे बाजारातील आवक जास्त राहीली. तर महाराष्ट्रातील आकही चांगली आहे. सध्या कापसाची भावपातळी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान कायम आहे. बाजारातील कापूस आवक कमी होऊन पुढील महिनाभरात कापसाच्या भावातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याला भावात मागील दोन आठवड्यांमध्ये अनेक बाजारात क्विंटलमागे ५० रुपयांची सुधारणा दिसून आली. यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने इथेनाॅल निर्मितीवर बंधने आली. धान्यामध्ये मक्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. त्यातच तेल कंपन्यांनी मक्यापासून निर्मित मक्याला प्रोत्साहन दिले.

यामुळे मक्याच्या भावात वाढ दिसून आली. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारातील हिरव्या मिरचीची आवक दिसेंदिवस कमीच दिसत आहे. बाजारातील आवक कमी असली तरी सणांमुळे मिरचीला उठाव चांगला आहे. यामुळे हिरव्या मिरचीचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.

सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे.हिरव्या मिरचीची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव आणखी सुधारू शकतात, असा अंदाज मिरची व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT