Garlic Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : लसणाच्या भावातील तेजी किती दिवस टिकेल?

Market Update : सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रतिक्विंटल १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव दबावातच आहे. पण सोयापेंडच्या भावात काहीशी वाढ झाली होती. सोयाबीनचा भाव १२.२२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. तर सोयापेंडच्या भावाने ३७३ डाॅलरची पातळी गाठली होती. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा भाव स्थिर आहे. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचा भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपये काढला होता.

तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार ५०० ते ४ हजार ७५० रुपयांचा भाव मिळाला होता. बाजारातली आवकही स्थिर होती. याचा दबाव दरावर दिसून येत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील आवक कमी होत जाऊन दरातही वाढ होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचे भाव दबावातच आहेत. कापसाला सध्या सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक टिकून आहे. कमी भावात आवक चांगली असल्याचा दबाव भावावर दिसून येत आहे.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाव काहीसे सुधारलेले दिसतात. देशातील वायदे स्थिर होते. कापूस बाजारातील आवकेचा प्रामुख्याने दरावर दबाव दिसून येत आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरातही सुधारणा दिसून येईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लसूण बाजारात सध्या चांगलाच भाव खात आहे. लसणाची बाजारातील आवक खपूच कमी आहे. तर मागणी मात्र चांगली दिसते. लसणाला सध्या लग्न समारंभ आणि हाॅटेल क्षेत्रातून चांगली मागणी येत आहे. याचा आधार लसणाच्या भावाला मिळत आहे.

त्यामुळे लसणाचे भाव तेजीत आले. सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रतिक्विंटल १८ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगेच वाढले आहेत. यापुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून, लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते, असा अंदाज आहे. 

बाजारात सध्या वांगीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी झाली मात्र वांगीला उठाव चांगला आहे. त्यामुळे वांगी भाव तेजीत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहे.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने वांगी पिकाला फटका बसला होता. तसेच कमी पाण्यामुळे लागवडीही कमी होत्या. याचा परिणाम आता बाजारातील आवकेवर होत आहे. सध्या वांग्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. वांग्याचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून आहेत. खरिपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे. तर बाजरीला सध्या उठाव चांगला आहे.

परिणामी बाजारीचा भाव टिकून आहे. बाजरीला सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. रब्बीतही बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाही. त्यामुळे पुढील काळातही बाजारीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT