Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: हिरवी मिरचीचे दर तेजीत; टोमॅटो दरात सुधारणा; केळी दरवाढ कायम, पेरू स्थिर, मक्याचा बाजार स्थिर

Daily Commodity Rates: आज आपण हिरवी मिरची, टोमॅटो, केळी, पेरु आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

हिरवी मिरची तेजीत

राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये हिरव्या मिरचीची आवक कमी झाली आहे. पावसामुळे पिकाला फटका बसला. अनेक भागात तोडा संपलेला आहे. तसेच नव्या लागवडी तोडणीला येण्यासाठी उशीर आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात तेजी आली आहे. सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे कमीच राहणार आहे. तर हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

टोमॅटो दरात सुधारणा

राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक मागणील काही आठवड्यांपासून कमीच होत आहे. पावसाचा टोमॅटो पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पिकाचे नुकसान वाढले. अनेक बागात सततच्या पावसाने पिकावर किड रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी सध्या टोमॅटोची बाजारातील आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागील ४ आठवड्यांपासून दरात सुधारणा दिसत आहे. टोमॅटोचे दर सध्या बाजारात सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. पुढील काही आठवडे टोमॅटोची आवक कमीच राहणार आहे. त्यामुळे दरातील तेजीही कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

केळी दरात वाढ

दर्जेदार केळीला सध्या चांगली मागणी आहे. राज्यातील केळी काश्मीर, पंजाब, दिल्ली येथे पाठविली जात आहेत. केळीला उत्तरेकडे उठाव आहे. केळी आवकेत मागील १० ते १२ दिवसांत सतत घट झाली आहे. मध्य प्रदेशातही केळी आवक कमी आहे. खानदेशात केळी दरात जूनच्या अखेरीस घसरण दिसली. परंतु मागील चार ते पाच दिवसांत दरात सुधारणा सुरू आहे. दर २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. सध्या निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत. मागील वर्षी जुलैच्या सुरुवातीला केळीचे कमाल दर १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल होते. या तुलनेत यंदा जुलैतच चांगली दरवाढ झाली आहे. केळीचे दर काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

पेरुचे दर टिकून

बाजारात सध्या पेरुचे दर टिकून आहेत. मागील काही आठवड्यांपासून बाजारात पेरुची आवक आणि दरही कमी झालेले दिसत आहेत. मे आणि जून महिन्यात पेरुला चांगला उठाव होता. तसेच बाजारात आवकही चांगली होती. मात्र, पाऊस वाढल्यानंतर पेरुची आवक कमी झाली. उठावही काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे पेरुचे दर टिकून आहेत. पेरुला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. पेरुची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

मक्याचा बाजार स्थिर

मक्याचे दर मागील दोन महिन्यांपासून एका पातळीच्या दरम्यान दिसत आहेत. देशात मागील २ वर्षांमध्ये मक्याला चांगला दर मिळाला. त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये मक्याची लागवड वाढून उत्पादन वाढले. त्यामुळे यंदा मक्याचे दर स्थिर दिसत आहेत. मक्याला सध्या बाजारात २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या दरात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये दिसलेली तेजी यंदा दिसण्याची शक्यता कमीच आहे. पुढील काळात मक्याची आवक कमी होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT