Market Bulletin :
सोयाबीनमध्ये चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली. मात्र सोयाबीन अद्यापही ९.८८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातही प्रक्रिया प्लांट्सनही सोयाबीनच्या खेरदी भावात क्विंटलमागे ५० ते ७५ रुपयांची वाढ केली होती.
पण बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारा भाव कायम होता. आजही सोयाबीनचा सरासरी भाव ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनच्या भावात चढ उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस दबावातच
देशात कापसाच्या बाजारावर सध्या आवकेचा दबाव आहे. कापसाची आवक सध्या शिगेला पोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आजही देशातील बाजारात ६ हजार ९०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाले आहेत. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ६८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. याचाही दबाव देशातील कापूस बाजारावर दिसत आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
हिरवी मिरची टिकून
बाजारातील हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. मात्र सरासरीच्या तुलनेत आवक कमीच आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. दुसरीकडे बाजारात मागणीही टिकून आहे.
परिणामी हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.
तिळाचे भाव स्थिर
तिळाचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे.
सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
केळीचे दर टिकून
राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे.
नवती बागांमधून काही प्रमाणात केळीची आवक सुरु झाली. पण आवकेचा जोर वाढलेला दिसत नाही. त्यातच थंडीचा केळी बागांवर परिणाम दिसत आहे. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीचा बाजार टिकून राहू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.