Tur Market
Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तूर उत्पादन घटल्यानं सरकारचं बाजारावर लक्ष

Anil Jadhao 

१) सोयाबीन स्थिरावले (Soybean Rate)

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन (Soybean production) यंदा ३३० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला. उत्पादनाचा अंदाज आणखी कमी होऊ शकतो. ब्राझीलमधील उत्पादनाचा अंदजा स्थिर ठेवण्यात आला.

युएसडीएच्या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडच्या (Soyameal) दरात काहीशी सुधारणा झाली होती. तर देशातील बाजारात आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला.

सध्या सोयाबीन दरात चढ उतार सुरु आहेत. मात्र सोयाबीन दर जास्त दबावात येणार नाहीत, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) कापूस बाजार सुस्तच (Cotton Rate)

देशातील अनेक बाजारांमध्ये कापसाचा कमाल दर कमी झाला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानं भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज पुन्हा कमी केला. पण सध्या बाजारातील कापूस आवक वाढली. त्याचा दबाव दरावर येत आहे.

सध्या कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. मात्र कापसाचे भाव जास्त दिवस दबावात राहणार नाहीत. दर सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) हरभरा दर दबावात (Chana Rate)

हरभरा दर सध्या दबावातच आहेत. सध्या हरभऱ्याला ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नाफेडने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील हरभरा विक्री बंद केली. इतर राज्यांमध्येही लवकरच हरभरा विक्री बंद होईल.

त्यातच उष्णता आणि पावसाचा पिकाला फटका बसतोय. त्यामुळं नाफेडची खरेदी सुरु झाल्यानंतर खुल्या बाजारातील दरही हमीभावाच्या दरम्यान पोहचू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

४) फ्लॉवरला उठाव कमी

फ्लॉवरचे दर सध्या दबावात आहेत. बाजारातील आवक काहीशी वाढल्यानं दरावर दबाव आलाय. मागील काही दिवसांपासून दरात क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांची नरमाई दिसून आली. सध्या फ्लाॅवरला प्रतिक्विंटल सरासरी ५०० ते ९०० रुपयांचा भाव मिळतोय.

पुढील काळात उष्णतेमुळे फ्लाॅवरची आवक कमी होण्याचा आहे. त्यामुळं फ्लाॅवरच्या दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केसला.

५) तुरीला यंदा काय भाव मिळू शकतो?

देशातील बाजारात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. सरकार तुरीच्या दरावर लक्ष ठेऊन आहे. देशात यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्याचंही सरकारनंही मान्य केलं. पण सरकार आयात करून देशातील तूर उपलब्धता वाढवेल, १० लाख टन तूर आयातीचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं सांगितलं जातं.

पण दुसरीकडे व्यापारी आणि उद्योग तूर आयात ८.५ लाख टनांपेक्षा जास्त होण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगतात. तुरीचा मागील हंगामातील स्टाॅकही कमी आहे. त्यामुळं यंदा तुरीचा तुटवडा जाणवणार आहे. असे व्यापारी सांगत आहेत.

तुरीला यंदा चांगला भाव मिळू शकतो, याची जाणीव असल्यानं शेतकरीही तुरीची विक्री मर्यादीत स्वरुपात करत आहेत. बाजारातील तुरीची आवक सध्या सरीसरीपेक्षा कमी आहे. दुसरीकडे सरकार बाजारात केव्हाही हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्यानं उद्योग सध्या गुरजेप्रमाणं खरेदी करत असल्याचं दिसतं.

पण आवकेच्या तुलनेत तुरीला मागणी चांगली आहे. त्यामुळं तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

यंदा सरकारनं तुरीच्या बाजारात हस्तक्षेप केला तरी एप्रिलनंतर दरातील तेजी वाढू शकते. तुरीचा सरासरी भाव ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT