Soybean Rate
Soybean Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशात सोयाबीनचे उत्पादन खरचं विक्रमी झाले का?

Team Agrowon

१) कापूस आवकेचा दबाव कायम (Cotton Rate)

देशातील बाजारात कापसाच्या दरातील नरमाई काहीशी थांबलेली दिसली. पण काही बाजारांमध्ये आजही कापसाचे भाव कमी झालेले दिसले. तर काही ठिकाणी दरात किंचित सुधारणा होती.

सरासरी दरपातळी मात्र ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे वाढीसह बंद झाले होते. बाजारात आवकेचा दबाव असल्याने भाव कोसळले आहेत. आवक कमी झाल्यानंतर कापसाच्या दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) नाफेडची खरेदी वाढूनही हरभरा दबावात (Chana Procurement)

नाफेडच्या हरभार खरेदीने आता २१ लाख टनांचा टप्पा पार केला. तूर आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. मुगाच्या दरात काहीशी नरमाई आली मात्र दरपातळी हमीभावाच्या दरम्यान आहे. त्यामुळे सरकार हरभरा खरेदी करत असून खुल्या बाजारावरही दबाव ठेऊन आहे.

हरभरा आजही ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. हरभऱ्याचे भाव पुढील काही दिवस दबावातच राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

३) केळीच्या दरात सुधारणा (Banana Rate)

राज्यातील काही भागात सध्या केळीची काढणी सुरु आहे. वाढत्या उन्हाचा केळी पिकाला फटकाही बसत आहे. बाजारातील आवक सध्या काहीशी अधिक दिसत असली तरी केळीला चांगला दर मिळत आहे.

केळीचे व्यवहार सध्या सरासरी १ हजार २०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील केळीची आवक पुढील काही दिवस कायम राहील तसेच दरपातळीही टिकून राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

४) टोमॅटोची आवक मंदावली (Tomato Rate)

राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोचे भाव किंचित वाढले आहेत. वाढत्या उन्हामुळे बाजारातील टोमॅटो आवक काहीशी मर्यादीत झाली आहे. राज्यातील पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर या मोठ्या बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसत असली तरी सरासरीपेक्षा कमीच आहे.

टोमॅटोला सध्या प्रतिक्विंटल ७०० ते १ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळात टोमॅटोची आवक कमी होऊन दरात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

५) सोयाबीनवरील दबाव दूर होईल का? (Soybean Rate)

सोयाबीनचे भाव सध्या दबावात आहेत. बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा काहीशी अधिक आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले आहेत. शेतकरी खरिपाच्या तोंडावर सोयाबीन विकत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. भाव कमी होत असले तरी सोयाबीनची आवक वाढत आहे. त्यामुळे सोयाबीन दरावर आणखीनच दबाव येत आहे.

सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादनाचा तिसरा अंदाज जाहीर केला. त्यामध्ये देशातील उत्पादन जवळपास १५० लाख टनांवर पोचल्याचे म्हटले आहे.

मागील हंगामातील अंतिम अंदाज १३० लाख टनांचा होता. म्हणजेच यंदा देशातील सोयाबीन उत्पादन २० लाख टनांनी वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पण सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सोपाने देशातील सोयाबीन उत्पादन १२४ लाख टनांवर स्थिरावल्याचा अंदाज दिला आहे.

शेतकरीही यंदाचे उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच असल्याचे सांगत आहेत. सध्या आवक जास्त असल्याने दरावरही दबाव राहील. पण जून महिन्यात सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पाऊस कसा पडतो यावर पुढील काळातील बाजाराचं चित्र बऱ्यापैकी अवलंबून असेल, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT