Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत हरभरा दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Agriculture Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये पुन्हा नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत ११.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३३५ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेल आयातीचा दबाव आहे. त्यामुळे सोयाबीन मागील दोन महिन्यांपासून ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा काहीशी वाढ दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत ७३.४४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढ उतार पाहायला मिळाले. पण बाजारातील कांद्याची आवक कमीच आहे. त्यामुळे सध्या कांद्याचा सरासरी भाव २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. यंदा देशातील कांदा उत्पादन घटले. त्यामुळे चांळीत कांदा कमी आहे. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभरा बाजारात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. बहुतांशी बाजारांमध्ये आवकही कमीच आहे. सरकारने हरभऱ्यासाठी आयात खुली केल्यानंतर भावातील वाढ थांबलेली दिसते. दुसरीकडे हरभऱ्याचा उठाव चांगला आहे. त्यामुळे हरभरा भाव आजही ५ हजार ७०० ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याची मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी काही महीने हरभरा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकंनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT