Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापसाच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती. कापूस वायदे पुन्हा ८०.४५ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदेही काहीसे कमी होऊन ५८ हजार ३८० रुपयांवर आले.

तर बाजारातील आवक ३८ हजार गाठींवर होती. दुसरीकडे बाजारातील कापसाचा सरासरी भाव कायम होता. आजही कापूस सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील हे चढ उतार आणखी दोन ते तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम होते. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव स्थिर दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन ११.५९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते.

तर सोयापेंड ३४४ डाॅलरवर आले होते. देशातील बाजारातही सोयाबीन दबावातच आहे. सोयाबीनला आज ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते? असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे.

तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचा भाव राज्यातील बाजारांमध्ये टिकून आहे. आल्याचे उत्पादन यंदा घटल्यामुळे बाजारातील आवक कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे.

आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

तुरीच्या भावातील तेजी कायम आहे.  वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११ हजारांच्या दरम्यान आला.

तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT