Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; मका दर स्थिर, फ्लॉवरचा भाव टिकून, बेदाणा दर घटले, गवारचा भाव वधारला

Daily Commodity Rates: आज आपण मका, फ्लाॅवर, बेदाणा, गवार आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

मक्याचे दर स्थिर

देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून मक्याचे दर स्थिर आहेत. मक्याला उठाव चांगला आहे. मात्र दुसरीकडे मक्याचा पुरवठाही आहे. यामुळे मक्याचे दर स्थिर आहेत. सध्या मका २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. मक्यासाठी सध्या तांदळाचा पर्याय इथेनाॅलसाठी आहे. तसेच पुढील काळात उसापासूनही इथेनाॅल निर्मिती होणार आहे. त्यामुळे दरावर दबाव येत आहे. मक्याला देशात चांगली मागणी आहे. मात्र भाववाढीला मर्यादा असल्याचे जाणकार सांगत आहेत.

फ्लाॅवरचे दर टिकून

राज्यातील बाजारात फ्लाॅवरची आवक कमी झाली आहे. पावसामुळे सर्वच भाजीपाल्याची आवक घटलेली आहे. त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. याचा आधार फ्लाॅवरला मिळत आहे. फ्लाॅवरची आवक कमी झाली असल्याने दरात सुधारणा झाली. सध्या फ्लाॅवरला सरासरी २५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे. पुढील काही आठवडे बाजारातील फ्लाॅवरची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे फ्लाॅवरचे दरही टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

बेदाणा आवक कमीच

देशात यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाणा दर गेल्यावर्षीपेक्षा अधिक आहेत. बेदाण्याला यंदा मागणीही चांगली राहीली. याचाही आधार दराला मिळाला. सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा २५० ते ३५० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर शेतकऱ्यांना मिळणारा दर २२० ते २७० रुपयांच्या दरम्यान आहे. सध्या बेदाण्याला सणांची मागणी येत आहे. त्यामुळे उठावही चांगला मिळत आहे. बेदाण्याची मागणी पुढील काही महीने चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेदण्याचे दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवार तेजीत

राज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत. बाजारातील आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढले आहेत. पावसामुळे गवारची आवक कमीच आहे. राज्यातील बहतांशी भागाता पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच नव्या लागवडी तोडणीला यायला उशीर आहे. सध्या बाजारात गावरला ६ हजार ते ८ हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळत आहे. राज्यातील केवळ पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक १०० क्विंटलपेक्षा आधिक दिसत आहे. इतर बाजारांमधील आवक ५० क्विंटलपेक्षाही कमी आहे. गवार बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दबावातच

देशातील बाजारात कापसाची आवक कमी आहे. शेतकऱ्यांकडे सध्या कापूस कमी प्रमाणात शिल्लक आहे. मात्र, सीसीआयची कापूस विक्री सुरुच आहे. सीसीआयने आतापर्यंत ३३ लाख गाठी कापूस विकला. सीसीआयच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच विक्रीचे दरही कमी झाले आहेत. याचा दबाव कापसाच्या दरावर येत आहे. कापसाला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये दर मिळत आहेत. देशात कापसाला उठाव स्थिर आहे. पुरवठा चांगला आहे. त्यामुळे कापसाचे दर दबावातच राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT