Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हळदीचे वायदे आता १४ हजारांवर पोचले

Market Bulletin : चालू हंगामात वाढलेली निर्यात आणि कमी पुरवठा यामुळे हळदीच्या दरात चांगलीच तेजी आली होती. पण मागील महिनाभरात निर्यातीसाठी मागणी कमी झाली. त्यामुळे हळदीच्या दरातील तेजी काहीशी कमी झाली होती.

अनिल जाधव

1. कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीसे चढ उतार आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे एक टक्याने कमी होऊन ८७.३५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५०० रुपयांनी कमी होऊन ६० हजार ९०० रुपयांवर आले होते. बाजार समित्यांमधील भाव मात्र ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाचे भाव चालू हंगामात टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

2. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे आज १३.४६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ३९६ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी ५ हजार १५० रुपयांचे भाव काढले होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. सोयाबीनच्या दरात पुढील काही दिवस चढ उतार दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

3. आल्याचे भाव मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. आल्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते ११ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारातील आल्याची आवक मागील काही महिन्यांपासून कमीच आहे. तर दुसरीकडे आल्याची मागणी कायम आहे. सणांच्या काळात आल्याची मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे आल्याच्या भावातील तेजी पुढील काळात आणखी काहीशी वाढू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

4. हिरव्या मिरचीचे भाव मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पण हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पुढील काळातही हिरव्या मिरचीची बाजारातील आवक मर्यादीतच राहण्याचा अंदाज आहे. परिणामी हिरव्या मिरचीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

5. चालू हंगामात वाढलेली निर्यात आणि कमी पुरवठा यामुळे हळदीच्या दरात चांगलीच तेजी आली होती. पण मागील महिनाभरात निर्यातीसाठी मागणी कमी झाली. त्यामुळे हळदीच्या दरातील तेजी काहीशी कमी झाली होती. हळदीचे वायदे आता १९ हजारांवर पोचले होते. पण ते आता १४ हजारांच्या दरम्यान आले. बाजार समित्यांमधील भावही १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान आहेत. मागील हंगामातील हळदीचा शिल्लक साठा कमीच आहे. त्यातच यंदा महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमधील लागवड यंदा २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली. तसेच दुष्काळी स्थितीचा हळद पिकाला फटका बसत आहे. कमी पावसामुळे यापुढील काळातही हळदीला पाण्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे हळदीची उत्पादकता कमीच राहण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात पहिल्या तिमाहीत हळद निर्यात तब्बल १६ टक्क्यांनी वाढली होती. सध्या निर्यात संथ असली तरी सणांच्या काळात निर्यातीला मागणी वाढू शकते. तसेच सध्या सणांसाठीही देशांतर्गत मागणी वाढत आहे. त्यामुळे हळदीचे भाव पुढील काळात पुन्हा वाढू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT