Agrowon Podcast Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : आतापर्यंत किती हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली?

Regional Bulletin : लातूर विभागात केवळ १७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

1. परभणी जिल्ह्यात २ कोटींवर सावकारी कर्जवाटप (Parbhani)


परभणी जिल्ह्यात सावकारी परवानाधारकांची संख्या ११० असून, त्यांनी २०२२-२३ या वर्षात १ हजार ३३५ कर्जदारांना २ कोटी ६५ लाख ३ हजार रुपये एवढे कर्ज वाटप केले आहे. वाटप केलेले कर्ज बिगर शेती कर्ज अंतर्गत आहे. अवैध सावकारी प्रकरणातील १८ शेतकऱ्यांच्या १९.४२ हेक्टर जमीन परत करण्याचे आदेश पारीत करण्यात आले, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. सावकारी कर्ज अंतर्गत तारण कर्जाचे दर दर साल दर शेकडा १५ टक्के, तर विनातारण कर्जाचे दर साल दर शेकडा १८ टक्के आहेत.

2. भूकंपग्रस्तांवर अन्याय, निर्णय दुरुस्त करण्याची मागणी
३० सप्टेंबर १९९३ च्या लातूर व धाराशिव जिल्ह्यातील भूकंपात हजारांवर लोकांनी आपले प्राण गमावले. अनेक बेघर झाले. मुले अनाथ झाली. भूकंपग्रस्तांचे फक्त पुनर्वसनासह स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी १७ नोव्हेंबर १९९४ रोजी प्रत्येक भूकंपग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र शासन निर्णयात वारंवार बदल होत गेले. शासनाने घेतलेल्या दोन निर्णयातून लातूर व धाराशिवच्या भूकंपग्रस्तांवर अन्याय होणारा शासन निर्णय दुरुस्त करा, अशी मागणी भूकंपग्रस्त कृती समितीची आहे.

3. नांदेड जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीच्या केवळ तीस टक्केच पाऊस


नांदेड जिल्ह्यात दरवर्षी जूनमध्ये मॉन्सूनचे धडाक्यात आगमन होत असते. अनेक वेळा या महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. परंतु यंदा मात्र जूनमध्ये पावसाने डोळे वटारल्याचे दिसून येत आहे. जूनमध्ये सरासरी १५५.४० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असते, यंदा फक्त ४५.४० मिलिमीटरनुसार केवळ २९.६० टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे खरिपातील पेरण्यासह पाणी, चाराटंचाईची शक्यता बळावली आहे. मराठवाड्यात सर्वाधिक नांदेडमध्ये सरासरी ८९१.३० मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा मात्र पावसाने जूनमध्येच दडी मारली होती. यामुळे खरिपातील पेरण्या खोळंबल्या  होत्या.

4. मराठवाड्यातील लघू प्रकल्प तळाला

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्प पाणीसाठा जवळपास तळाला गेल्याची स्थिती आहे. या सर्व लघू प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ८६ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर ३३६ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. याशिवाय १७ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ही जोत्याखाली असून, अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांमधील पाणीसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे. कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ७, बीडमधील ३२, लातूरमधील १२, धाराशिवमधील ३५, लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

5. लातूर विभागात केवळ १७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी

कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यात ३० जून अखेरपर्यंत सरासरी २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १७,४६७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यातील हवामान गत आठवडाभरात उष्ण व कोरडे होते. लातूर कृषी विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर आहे. ३० जून अखेरपर्यंत विभागात ४८.२४ मिलिमीटर इतका पाऊस झाला. ३० जून अखेरच्या सरासरीच्या तुलनेत तो ३३ टक्के असून वार्षिक सरासरीच्या केवळ ६ टक्के इतका आहे. पावसाच्या लहरीपणामुळे अजून विभागातील पाचही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला गती दिलेली दिसत नाही. लातूर, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या काही शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. लातूर कृषी विभागात तूर पिकाची सरासरी क्षेत्र तीन लाख ४९ हजार २५३ हेक्टर आहे. मात्र आतापर्यंत केवळ १३८९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून ७३१७ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. कपाशी पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ८८ हेक्टर आहे. पण प्रत्यक्षात ८११४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. खरीप ज्वारी पिकाचे क्षेत्र ९४ हजार १७८ हेक्टर असून अजून ज्वारीच्या पेरणीला शेतकऱ्यांनी सुरवात केलेली नाही. बाजरीचे सरासरी ११ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना प्रत्यक्षात बाजरीची पेरणी झालेली नाही. मका पिकाचे सरासरी क्षेत्र ३० हजार ९६५ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी झालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT