Market Bulletin  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस वायदे ११ महिन्यातील उचांकी पातळीवर !

Market Bulletin : यंदा जागितक पातळीवर आणि देशातील कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. देशातील वायद्यांमध्येही चांगली तेजी आली आहे.

अनिल जाधव

1. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे आज वाढले होते. तर देशातील बाजारात आज सोयाबीन दरात काहीशी वाढ झाली होती. सोयाबीनला आज सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दरात काहीशी वाढ करून ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांचा मिळाला. देशात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने सोयाबीनच्या दरातही चांगली वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

2. मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात वाढ झाली आहे. देशातील तुरीची लागवड कमी झाली असून पिकाला दुष्काळाचा फटका बसत आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या सणांमुळे तुरीला चांगला उठाव मिळत आहे, त्यामुळे तुरीचे भाव सरासरी ११ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. 

 
3. देशातील बाजारात कांद्याचे भाव सध्या दबावातच आहेत. कांद्याला आजही बाजारात १ हजार ३०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील कांदा आवक मात्र दिवसेंदिवस कमी होत आहे. पुढील काळात बाजारातील कांदा आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच खरिपातील पिकाचे उत्पादनही कमी होणार आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चांगली वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

4. बाजारात टोमॅटो भावात घसरण झाली आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव आला होता. त्यातच सरकारने टोमॅटो आयातीचा मानसिक दबाव बाजारावर टाकला होता. परिणामी टोमटोचे भाव महिनाभरात निम्म्यापेक्षा अधिक कमी झाले. सध्या टोमॅटोला १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपये भाव मिळत आहे. टोमॅटोचे भाव पुढील काळातही याच पातळीवर दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्य्कत केला.

5. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात चांगलीच तेजी आली आहे. देशातील वायद्यांमध्येही चांगली तेजी आली आहे. मात्र बाजार समित्यांमधील व्यवहार थंडवल्याने बाजार स्थिर दिसतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज मागील ११ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोचले होते. इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंज अर्थात आयसीईवर कापसाचे वायदे आज ८९.९८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. चीन आणि अमेरिका या दोन महत्वाच्या देशांमध्ये कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, चीनमधील कापूस पिकाला यंदा पूर आणि अति उष्णतेचा फटका बसला. शेतकऱ्यांनीही लागवडही कमी केली होती. यामुळे चीनमधील कापूस उत्पादन कमी राहणार आहे. मात्र चीनचा कापूस वापर येत्या हंगामात वाढणार आहे. त्यामुळे चीनची कापूस आयात वाढून आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराला आधार मिळणार आहे. देशातील बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर वायद्यांमध्ये कापसाला ६१ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. देशातील कापूस उत्पादनही यंदा घटणार आहे. पण देशातील उत्पादन किती प्रमाणात कमी होईल, याचा अंदाज लगेच बांधता येणार नाही. पण यंदा उत्पादनात येणारी घट मोठी असेल. त्यामुळे कापसाच्या बाजारभावाला चांगला आधार मिळू शकतो, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT