Sugar Export  Agrowon
बाजार विश्लेषण

Sugar Export : बारा लाख टन साखर निर्यातीला परवानगी मिळणार?

चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा पुरवठा कमी झाला होता. ब्राझीलसह काही देशांत साखरेचे उत्पादन घटले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात तेजी आली.

टीम ॲग्रोवन

पुणेः केंद्राने साखर निर्यातीवर बंधने लादली आहेत. तरी ७ ते ८ लाख टन साखर निर्यातीला परवानगी मिळेल, अशी आशा उद्योगाला आहे. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी १२ लाख टन निर्यातीला परवानगी मिळू शकते, असे संकेत दिले. असे झाल्यास उद्योगाला मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा पुरवठा कमी झाला होता. ब्राझीलसह काही देशांत साखरेचे उत्पादन घटले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात तेजी आली. याचा लाभ अतिरिक्त साठा असलेल्या भारताला झाला. त्यातच चालू हंगामात भारत साखर उत्पादनात आघाडीवर राहिला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने देशातून साखर निर्यात वाढली.

निर्यात वाढल्याने देशात टंचाई भासून दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त करत सरकारने निर्यातीवर निर्बंध लादले. २४ मे रोजी अद्यादेश काढून १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत १०० लाख टन निर्यातीचा कोटा सरकारने जाहिर केला. परंतु तोपर्यंत देशातून जवळपास ८५ लाख टन साखरन निर्यात झाली होती. तर बाकी निर्यातीच्या प्रक्रियेत होती. त्यामुळे निर्यातीचा कोटा वाढवून देण्याची मागणी उद्योग करत होता. तर केंद्रीय अन्न मंत्रालयाने जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीसाठी परवाना मागणाऱ्या निर्यातदारांना १० लाख टनांचा कोटा जाहिर केला. परंतु कारखान्यांना या निर्यातदारांना ८ लाख टन साखर विक्रीची परवानगी दिली होती. त्यामुळे पेच निर्माण झाला.

त्यामुळे इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्माने केंद्रीय अन्न सचिवांना पत्र लिहून निर्यात कोट वाढविण्याची मागणी केली. ``सध्याही आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चांगले आहेत. तर पुढील हंगामातही गाळपासाठी जास्त ऊस उपलब्ध होईल,`` अशी शक्यता इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदीत्य झूनझूनवाला यांनी अन्न सचिवांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली. देशातील साखर कारखान्यांनी १७ लाख टन निर्यातीचे करार केले असून निर्यातीची परवानगी मागितली. परंतु सरकारने केवळ ८ लाख टनांची परवानगी दिली. तर उद्योगाच्या मते ४ लाख टन कच्ची साखर कारखान्यांकडे आहे. तसेच बंदरांवरही एवढीच साखर पडून आहे, असेही झूनझूनवाला यांनी पत्रात म्हटले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (ता.२०) काही विभागांच्या सचिवांसोबतदेशातील साखर उपलब्धता आणि दराचा आढावा घेतला. या बैठकीत अमित शहा यांनी १२ लाख टन साखर निर्यातीला परवानगी मिळू शकते, असे संकेत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळेल. तसेच एवढी साखर निर्यात झाल्यानंतर देशातील दरावर काहीच परिणाम होणार नाही, असा दावा साखर उद्यागाने केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mixed Cropping Model : अल्पभूधारकांसाठी ठरतेय मिश्र पीक पद्धती फायदेशीर

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून मिळाली शाश्‍वती

Livestock Management: उत्तम आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्राधान्य

Poultry Farming: देशी कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन

Tomato Onion Prices: आंध्र प्रदेशात कांदा, टोमॅटोचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; टोमॅटो फेकून देण्याची वेळ

SCROLL FOR NEXT