कांदा 
बाजार विश्लेषण

Onion Minimum Export Price: कांदा उत्पादकांवर केंद्राचा आणखी एक आघात; कांद्याच्या किमान निर्यातमुल्यात ८०० डाॅलरपर्यंत वाढ

वाढवलेले किमान निर्यातमूल्य ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार

Anil Jadhao 

पुणेः देशात कांद्याचा पुरवठा वाढावा आणि कांद्याचे वाढत असलेले भाव कमी व्हावे यासाठी केंद्राने आज (ता.२८) कांद्याचे किमान निर्यातमुल्य वाढवले आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर किमान निर्यातमुल्य ८०० डाॅलर प्रतिटन झाले आहे. किमान निर्यातमुल्य म्हणजे यापेक्षा कमी भावात कांदा निर्यात करता येणार नाही. सरकारने यापुर्वीच कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. आता किमान निर्यातमुल्यातही वाढ केली आहे.

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची टंचाई भासत आहे. कांद्याच्या निर्यातीवर यापुर्वीच केंद्र सरकारने ४० टक्के शुल्क लावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आधीच रोष होता. सरकारच्या या निर्णयाचा कांदा बाजारावर तब्बल दोन महिने दबाव राहिला. आता मागील दोन आठवड्यांपासून कांद्याची बाजारातील आवक जास्तच कमी झाली. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली. कांदा भाव जवळपास दुप्पट झाले. बहुतांशी बाजारात कांद्याचा घाऊक भाव ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान झाला होता.

पुढील दीड ते दोन महिने बाजारातील कांदा आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. कारण कांद्याची उपलब्धता खूपच कमी आहे. यामुळे कांदा भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांदा निर्यात मुल्यात वाढ केली. यापुर्वी कांद्याचे किमान निर्यात मूल्य ४०० डाॅलर होते. ते आता दुप्पट करण्यात आले.

काय निर्णय होऊ शकतो?
केंद्राने यापुर्वीच निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. तर देशात कांद्याची टंचाई आहे. त्यामुळे सध्या होणारी कांदा निर्यात खूपच कमी आहे. सरकारने किमान निर्यात मुल्यात वाढ केली तरी यामुळे देशातील बाजारात फार मोठा पुरवठा वाढेल असे नाही. टंचाई कायम राहणार आहे. यामुळे दर कमी होण्याची शक्यता दिसत नाही. पण सरकारच्या या निर्णयाचा काहिसा मानसिक परिणाम बाजारावर दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द : महसूलमंत्री बावनकुळे

Agricultural Tools Scam: घोटाळेबहाद्दरांचे कारनामे

Forest Land Leasing: वनक्षेत्राजवळील जमीन भाडेपट्ट्याने

Vidarbha Heavy Rain : विदर्भात २५८ मंडलांत अतिवृष्टी; उर्वरित राज्यात जोर कमी

Sewage Treatment Project: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जी

SCROLL FOR NEXT