Moong Market
Moong Market Agrowon
बाजार विश्लेषण

Moong Market : खानदेशात मूग दर ६५०० ते ७००० रुपये

Team Agrowon

खानदेशात मुगाचे उत्पादन (Moonge Production) हाती आले आहे. परंतु उत्पादन एकरी ३० ते ६० किलो एवढे आले आहे. यामुळे बाजारात(Moonge Market) आवकही कमी आहे. सर्वच बाजार समित्यांमध्ये दर ६५०० ते ७१०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे.ग्रामीण भागात काही किरकोळ खरेदीदार, लहान व्यापारी मूग खरेदीसाठी जात आहेत. खेडा खरेदी यंदा प्रथमच अनेक खरेदीदार करीत आहेत. कारण शेतकऱ्यांना उत्पादन कमी आहे. क्विंटलभर मूग बाजारात विक्रीला आणणे, त्याची तोलाई, हमाली, वाहतूक खर्च यात वेळ व पैसा वाया जातो. यामुळे गावातच ग्राहकांना शेतकरी मूगविक्री करीत आहेत. बाजारात आवक कमी असल्याने खरेदीदार गावोगावी जात आहेत.

तापी, पांझरा, अनेर नदीकाठच्या भागांत मूग पीक अधिक होते. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, चोपड्यातील काही भाग, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, बोदवड, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार भागात मूग पीक होते. सर्वत्र उत्पादन एकरी ३० ते ६० किलो एवढेच हाती आले आहे. दर्जा चांगला आहे. कारण मूग काढणीदरम्यान पाऊस नव्हता. पीक सुरुवातीला चांगले होते. परंतु ऑगस्टमध्ये पिकात दाणे भरण्याच्या काळात १५ दिवस पावसाचा खंड होता.

ऊन पडत होते. यामुळे हलक्या व मध्यम जमिनीत उत्पादन कमी आहे. काळ्या कसदार जमिनीतही उत्पादन घटले आहे. जळगावमधील जळगाव, चोपडा, अमळनेर येथे मुगाची आवक होत आहे. धुळ्यातील दोंडाईचा व नंदुरबारमधील नवापूर व नंदुरबार बाजारात मूग आवक होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव बाजारात मिळून रोज १५ ते १८ क्विंटल एवढीच मुगाची आवक होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आवक बरी आहे. परंतु पीक पेरणीच्या तुलनेत आवक कमी आहे. काही शेतकरी गावातच ८००० रुपये प्रतिक्विंटल किंवा यापेक्षा अधिक दरात मुगाची विक्री करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT