Green Peas
Green Peas Agrowon
बाजार विश्लेषण

Nashik Green Peas : नाशिक बाजारात वाटाण्याची आवक सुरू

Mukund Pingale

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याची आवक सुरू झाली आहे. ५ ते ११ ऑगस्टदरम्यान १७७ क्विंटल आवक झाली.त्यास किमान ७,००० कमाल १०,५०० व सरासरी ९,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला बाजार आवारात मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ दिसून आली आहे. 

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ५,००८ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३,५०० ते ४,८०० असा तर सरासरी दर ४,२०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ३,५०० ते ५,००० तर सरासरी दर ४,४०० रुपये राहिला. सप्ताहात आवकेत वाढ झाल्याचे दिसून आले.

हिरवी मिरचीची आवक ३८६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३,४५० ते ४,००० रुपये तर सरासरी दर ३,८०० रुपये मिळाला. गाजराची आवक कमी झाली असून अवघी ५७ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल २,००० ते २,५०० तर सरासरी दर २,३०० रुपये राहिला.

 उन्हाळ कांद्याची आवक २२,२७९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६,०० ते २,१५१ तर सरासरी दर १,८०० रुपये राहिला.लसणाची आवक १७७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७,८०० ते १८,६०० तर सरासरी दर १४,५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,६६५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,१०० ते १,५५० तर सरासरी दर १,२५० रुपये राहिला. अद्रकाची आवक २७४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १८,००० ते २१,००० तर सरासरी दर १९,३०० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ३०० ते १,३०० तर सरासरी ९००,वांगी ३०० ते ५०० तर सरासरी ४००, फ्लॉवर ११० ते ३०० सरासरी २५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले.तर कोबीला १०० ते २६० तर सरासरी १७५ रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.ढोबळी मिरचीला ४०० ते ६५० तर सरासरी दर ५४० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १२० ते ३००  तर सरासरी १८०,गिलके ४०० ते ६०० तर सरासरी ५२५, दोडका ७०० ते ८०० तर सरासरी दर ७५० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १४३० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७५० ते १,०५० तर सरासरी दर ७५० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ८,४२५ क्विंटल झाली.मृदुला वाणास ४०० ते ११,००० तर सरासरी ७,००० रुपये दर मिळाला. दरात घसरण दिसून आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : पाणीटंचाईची सर्वाधिक झळ महिलांनाच

Interview with Vikas Patil : शेतकऱ्यांनी केवळ युरियाचा आग्रह धरू नये

Village Story : वळवाचा पाऊस...

Turmeric Cultivation : हळद लागवडीची पूर्वतयारी

Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT