Market Bulletin Agrowon
बाजार विश्लेषण

Agrowon Podcast : काबुली हरभरा तेजीवर स्वार

Market Bulletin : काबुली हरभऱ्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. दरातील वाढ दिवसेंदिवस आता वाढताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याला उठावही चांगला मिळतोय.

Anil Jadhao 

1. कापसाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये आज नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे ८५ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. तर देशातील वायदे ३०० रुपयांनी कमी होऊन ५८ हजार ८०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम होती. कापूस दरावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

   
2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वाद्यांमध्ये आजही सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे १२.८३ डाॅलरवर होते तर सोयापेंडच्या वायद्यांनी ३९२ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशात मात्र सोयाबीनवरील दबाव कायम दिसतो. सोयाबीनला बाजारात ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस दबावातच दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. देशातील बाजारात सध्या गव्हाचे भाव वाढले आहेत. गव्हाच्या भावात झालेल्या वाढीमुळे केंद्र सरकार भाव पाडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे. गव्हाला सध्या बाजारात २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपयांचा भाव मिळत आहे. सणांमुळे गव्हाला मागणी वाढत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

4. बाजारात शेवग्याचे भाव टिकून आहेत. कमी पावसामुळे बाजारातील शेवग्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र शेवग्याला असलेला उठाव कायम आहे. यामुळे शेवग्याचे भाव सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही दुष्काळी स्थितीमुळे शेवग्याची आवक कमीच राहून दर स्थिर दिसू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

5. काबुली हरभऱ्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. दरातील वाढ दिवसेंदिवस आता वाढताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याला उठावही चांगला मिळतोय.देशात काबुली हरभऱ्याचे उत्पादन घटले. काबुली हरभऱ्याला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला. त्यामुळं उत्पादकता कमी राहीली. सरकारने देशात ४ लाख ५० हजार टन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. पण उत्पादन ४ लाख टनांच्या आतच स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत गेली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या बाजारांमध्ये काबुली हरभरा आवक मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.

एकीकडे देशी हरभरा दबावात असताना काबुली हरभरा मात्र तेजीत आला. सध्या बाजारातील आवक कमी असताना उठाव मात्र चांगला मिळत आहे. जागतिक बाजारातही काबुली हरभरा आता भाव खाताना दिसतो. भाव वाढल्याने स्टाॅकीस्टही हळूहळू माल बाजारात आणताना दिसत आहेत. सध्या काबुली हरबऱ्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आताना दिसतो. तर कमाल भाव १४ हजारांवर पोचला. हा भाव मालाचा आकार आणि गुणवत्तेनुसार मिळत आहे. पुढील काळातही काबुलीची आवक कमीच राहील. त्यामुळे दरातील तेजीही टिकून राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT