Ghodganga Sugar Mill Agrowon
बाजार विश्लेषण

घोडगंगा साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ साठी यंदाचे २०२२-२३ ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर (Ghodganga Sugar Mill) कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ साठी यंदाचे २०२२-२३ ऊस लागवड धोरण (Sugarcane Cultivation Policy) जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाच्या चांगल्या जातीच्या लागवडीवर भर द्यावा, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी दिली.

आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२ आणि को-२६५ ऊस जातींसाठी आडसाली ऊस लागवडीचा कालावधी १ जून ते ३१ ऑगस्ट २०२० आहे. तर, को-८६०३२, व्हीएसआय-०८००५, कोव्हीएसआय ९८०५, फुले २६५, कोसी-६७१ या ऊस जातींसाठी पूर्व हंगामी लागवड कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर असणार आहे. त्याचप्रमाणे सुरू ऊस लागवडीचा कालावधी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ असा आहे. या कालावधीत को-८६०३२, कोसी ६७१, व्हीएसआय -०८००५, कोव्हीएसआय-९८०५, व्हीएसआय-४३४ व एमएस १०००१ या ऊस जातींची लागवड शेतकरी करू शकतात. लागवड करताना उसाचे बेणे नऊ ते दहा महिने कालावधीचे वापरावे.

दोन डोळ्यांची टिपरी वापरून लागवडीच्या दरम्यान दोन टिपऱ्यांमधील अंतर नऊ इंच ठेवावे. यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करण्यात येणार असल्यामुळे ऊस लागवड करताना पाच फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवून ऊस लागवड करावी. ठिबक सिंचनाने लागवड केलेल्या उसाला आगामी काळात ऊस तोडणीसाठी प्राधान्याने ऊस तोड देण्यात येणार आहे. तसेच ऊस तोडणी कार्यक्रम राबवताना उसाची रिकव्हरी तपासून जादा साखर उतारा असणाऱ्या उसाला ऊस तोड देण्यात येईल.

ज्या शेतकऱ्यांना उसाची लागवड रोपांपासून करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांनी ऊस लागवड धोरणाच्या पुढे तीस दिवसांनंतर शेतात ऊस रोपांची लागवड करावी व त्याच दिवशी ऊस लागवडीची नोंद करावी. त्याचप्रमाणे कारखान्याने गाळप केलेल्या सर्व उसाचा खोडवा शेतकऱ्यांना ठेवावा व ऊस उत्पादकांना माती परीक्षण करून घेऊन शिफारस केल्यानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांना उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत योग्य दरात दिले जाईल. तसेच हुमणी नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा पुरवठा, ऊस उत्पादक सभासदांना कारखाना रोपवाटिकेतून फळझाडे, फूलझाडे व शोभिवंत झाडे योग्य दरात पुरविण्यात येईल, अशीही माहिती श्री. पवार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT