Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Rate: आंबा हंगाम अंतिम टप्प्यात प्रति डझन ३०० ते ५०० रुपयांवर दर

Mango Season: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पूर्व पट्ट्यातील आंबा देखील बाजारात दाखल झाला आहे. उत्पादनात घट असली तरी सध्या प्रति डझन ३०० ते ५०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून, पूर्वपट्ट्यातील आंबादेखील बाजारपेठेत दाखल झाला आहे. त्यामुळे प्रति डझन ३०० ते ५०० रुपये दराने आंबा विक्री सुरू आहे.

फेब्रुवारी-मार्चपासून सुरू झालेला आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. देवगड परिसरातील हापूस आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक बागायतदारांनी आंबा हंगामाचा शेवट केला आहे. काही मोजक्या आंबा बागायतदारांकडे आंबा शिल्लक आहे.

दरम्यान, पूर्वपट्ट्यातील आंबा देखील पाच-सहा दिवसांपासून बाजारपेठेत दाखल झाला आहे. सध्या आंब्याला प्रति डझन ३०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. आंबा पेटीची विक्री १५०० ते १७०० रुपयांपर्यंत सुरू आहे.

या वर्षी आंबा उत्पादन २५ ते ३० टक्के राहिले आहे. पहिल्या टप्प्यात आंब्याला प्रचंड मोहोर आला. मात्र ५ टक्के देखील फळधारणा झालेली नाही. पूर्ण मोहर काळवंडल्याचे चित्र होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मोहर आला.

या मोहराला फळधारणा झाली. सध्या त्याच मोहराचा आंबा बाजारपेठेत दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहर वाढलेल्या तापमानामुळे करपला. त्यामुळे १० मेनंतर आंबा किरकोळ स्वरूपात बाजारपेठेत दिसण्याची चिन्हे आहेत.

पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम पाच-सहा दिवसांपासून सुरू आहे. या भागातील हंगाम मेअखेरपर्यंत चालणार आहे. पाऊस झाल्यास मात्र हंगाम संपुष्टात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. या भागातील आंब्याला देखील ३०० ते ५०० पर्यंत दर मिळत आहे. आकाराने लहान असलेल्या आंब्याला त्यापेक्षा कमी दर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा आवक कायम, कांद्याच्या भावात वाढ, मेथी बाजारात चढ-उतार, शेवगा दरात बदल तर पपईच्या दरात वाढ

Maharashtra Protest Cases: राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ, शासन निर्णय जारी

Agricultural Training: कृषी विस्तारकार्याला अधिक गतिमान करा : डॉ. इंद्र मणी

Gajar Gavat Control: गाजर गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी काय करावे?

Workers Protest: असंघटित कष्टकऱ्यांचे पैठण गेटवर धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT