Pune Maize Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Production : खानदेशात मका उत्पादन कमी होण्याचा अंदाज

खानदेशात मक्याची आवक कमीच आहे. गारपीट, पावसाचा परिणाम पिकावर झाला असून, यंदा उत्पादनदेखील कमी येईल, अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Maize Market Update जळगाव ः खानदेशात मक्याची आवक (Maize Arrival) कमीच आहे. गारपीट (Hailstorm), पावसाचा परिणाम पिकावर झाला असून, यंदा उत्पादनदेखील (Maize Production) कमी येईल, अशी स्थिती आहे.

मका पिकाची खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवड मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे पाच हजार हेक्टरने वाढली. पण ती अपेक्षेपेक्षा कमी आहे.

यामुळे आवक कमी आहे. परंतु पीक आडवे झाल्याने पुढे उत्पादनदेखील कमी येईल, असे दिसत आहे. अनेक शेतकरी मक्याचे एकरी ३० ते ३५ क्विंटल उत्पादन साध्य करतात. तर किमान १८ ते २० क्विंटल एकरी उत्पादन अनेकांच्या हाती येते.

परंतु मका लागवडीसाठी प्रसिद्ध जळगावमधील चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागांत वादळ व गारपिटीने पिकांची मोठी हानी झाली आहे.

पीक निसवले होते, त्यात दाणेही पक्व होत होते. पण अशातच पीक आडवे झाल्याने त्यात दाणे पक्व होणार नाहीत. कणसे मातीत गेल्याने त्यांची हानी वाढेल. उत्पादन अत्यल्पच येईल.

अनेकांनी आडवे झालेले पीक काढण्यास सुरवात केली आहे. कारण त्यात उत्पादन हाती येणार नाही. दुसरीकडे काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दूध उत्पादक, डेअरी फार्मचालकांना हिरवा चारा म्हणून त्याची विक्री केली आहे. क्षेत्र रिकामे करून त्यात पुढे इतर हंगामाचे नियोजन आहे.

मक्याचे १० ते १२ हजार हेक्टरचे नुकसान

खानदेशात एकूण सुमारे ६० हजार हेक्टरवरील पिकांना वादळ, गारपीट व पावसाचा फटका बसला आहे. त्यात मक्याचे सुमारे १० ते १२ हजार हेक्टरवर मोठे नुकसान झाले आहे. त्यात मक्याचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच मोठा फटका बसला आहे. यामुळे उत्पादकतेवर परिणाम होईल.

वीजपुरवठा विस्कळित

वादळात अनेक भागात खांब वाकले आहेत. यामुळे कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास अडचण येत आहे. तसेच जळगाव, चोपडा, रावेर भागांत काही शेतकऱ्यांच्या रोहित्रांचे नुकसान झाले आहे.

त्यांचीही दुरुस्ती वीज कंपनीकडून करणे अपेक्षित आहे. पण यास विलंब लागत असल्याने मका पिकाचे सिंचन रखडले आहे. यातही पिकांची हानी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT