Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market: खानदेशात मका आवक कमी; सरासरी दर १८०० रुपये क्विंटल

Khandesh Market Update: खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये सध्या मका आवक कमी असून, सरासरी दर १८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिर आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळे, नंदुरबार येथील बाजारात मका १६१० ते २००० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात विविध बाजार समित्यांमध्ये मका आवक सध्या कमी आहे. अर्ली लागवडीच्या मका पिकात मळणी होऊन त्याची आवक मात्र सुरू झाली आहे. आवक कमी असल्याने मका दर स्थिर आहेत. मक्याला १६१० ते २००० रुपये व सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलला दर सध्या खानदेशात आहे.

आवक मागील ८ ते १० दिवसांत सुरू झाली आहे. ही सुरुवातीची आवक असल्याने दर मात्र स्थिर आहेत, किंवा मोठी पडझड दरात होत नसल्याचे चित्र आहे.खानदेशात जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा व नंदुरबार या बाजार समित्या मक्यासाठी प्रसिद्ध आहेत.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर व जळगावात मिळून तीन हजार क्विंटल मक्याची आवक शनिवारी झाली. त्यास प्रतिक्विंटल १६१० ते २००० रुपये व सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. धुळ्यातही शिरपूर आणि दोंडाईचा येथेही दरपातळी १५७५ व कमाल २००५ रुपये प्रतिक्विंटल अशी होती. तेथेही सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलला दर होता.

नंदुरबार जिल्ह्यातही कमाल दर २००० रुपये प्रतिक्विंटल आणि किमान दर १४७५ रुपये प्रतिक्विंटल, असे राहिले. तेथेही सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. भडक पिवळ्या रंगाच्या व चमकदार दाण्यांच्या मक्यास दर चांगले मिळाले. तसेच बारीक आकाराच्या, हलक्या पिवळ्या मक्याचे दर कमी आहेत. मक्याची आवक याच महिन्यात किंवा मागील काही दिवसांत सुरू झाली आहे.

खानदेश नजीकच्या मलकापूर (जि. बुलडाणा), नांदगाव (जि. नाशिक) येथेही कमाल दर २००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तेथेही सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटल असून, आवक वाढली आहे. खानदेश नजीकच्या मध्य प्रदेशातील बडवानी, बऱ्हाणपूर येथील बाजारातही मक्याची आवक या आठवड्यात सुरू झाल्याची माहिती आहे. तेथेही सध्या मिळून रोज चार हजार क्विंटल मक्याची आवक होत आहे.

दीड लाख हेक्टरवर लागवड

खानदेशात पुढे मका आवकेत वाढ होईल. कारण सर्वत्र मळणी सुरू होणार आहे. मका लागवड खानदेशात दीड लाख हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यातील लागवड एक लाख पाच हजार हेक्टर एवढी होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT