Soybean Conclave Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Conclave : सोयाबीनसाठी मध्यप्रदेशने सर्वंकष धोरण ठरवावे

आंतरराष्ट्रीय सोयाबीन परिषदेतील सूचनांचा विचार करून बियाणे ते प्रक्रियेपर्यंत सर्वंकष धोरण ठरवण्यात यावे. त्याकरता मध्यप्रदेश सरकारने महत्त्वाची भूमिका वठवावी.

टीम ॲग्रोवन

नागपूर : आंतरराष्ट्रीय सोयाबीन परिषदेतील (International Soybean Council) सूचनांचा विचार करून बियाणे ते प्रक्रियेपर्यंत (Seed To Processing Policy) सर्वंकष धोरण ठरवण्यात यावे. त्याकरता मध्यप्रदेश सरकारने महत्त्वाची भूमिका वठवावी. शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणात (Climate Change) तग धरणारे वाण उपलब्ध व्हावे त्याची उत्पादकता १५ क्विंटलपर्यंत मिळावी यातून शेतकऱ्यांच्या हातात खेळता पैसा राहील व समृद्धी नांदेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.

इंदूर येथे सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा)च्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय सोयाबीन परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘सोपा’चे अध्यक्ष डॅविश जैन, शेतमालाचे अभ्यासक पाशा पटेल, मध्यप्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल यांची यावेळी उपस्थिती होती. गडकरी यांनी ऑनलाइन पद्धतीने या परिषदेत मार्गदर्शन केले. सोयाबीन हे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रोटीन उपलब्ध करणारे खाद्यान्न ठरले आहे. काही देशांमध्ये जनावरांकरिता याचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग होतो.

भारतात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विदर्भाच्या मेळघाट मध्ये अडीच हजारावर बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर सोयाबीन हे चांगले प्रोटीन पुरवठा करणारे घटक म्हणून उपयोगी पडणार आहे. कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रोटीनचा पुरवठा शरीराला होणे गरजेचे आहे. त्यामुळे सोयाबीनचा कुपोषणमुक्तीसाठी वापर कसा करता येईल याचा विचार देखील या परिषदेतून झाला पाहिजे. अमेरिकेत सोयाबीन चापपासून तयार केलेले व्हेज चिकन, व्हेज मटण प्रसिद्ध झाले आहे.

त्याच धर्तीवर भारतात देखील अशा प्रकारच्या व्हेज आणि पौष्टिक अन्न घटकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सोयाबीन केकचे मूल्यवर्धन झाल्यास त्यालाही चांगले दर मिळतील त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला पैसा होणार आहे. ब्लॅक सॉल्ट, लिंबू वगैरेचा वापर करून सोयाबीन पासून चविष्ट शेव तयार करण्याचा प्रयोग झाला आहे. सोयाबीन बेस फरसाणलाही येत्या काळात चांगली मागणी राहील अशी शक्यता पाहता त्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

मध्यप्रदेशची फरसाण क्षेत्रातही वेगळी ओळख आहे. त्यामुळे याच भागातून सोयाबीनचे वेगवेगळे फरसाणचे पदार्थ तयार झाल्यास त्याला चांगली बाजारपेठ मिळेल. ४९ टक्के प्रोटीन यात आहे. त्यामुळे चव आणि प्रोटीनचा मेळ यातून साधता येतो. भारतीयांचे आरोग्य यामुळे राखले जाणार आहे. सोयाबीन कुटार देखील प्रोटीन युक्त आहे. मी त्याचा वापर केला असता १५ ते २० दिवसांत जनावरांचे आरोग्य सुधारत दुधाच्या संकलनात ही वाढ झाली.

त्यात काही अन्य घटकांचे मिश्रण करून पॅलेट स्वरूपात चांगले पशुखाद्य गावस्तरावरच तयार करता येणार आहे. त्यातून गावात रोजगार निर्मितीचा उद्देश साधता येईल. खाद्यतेलाच्या बाबतीत भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. सूर्यफूल तेलाची आयात कमी केल्यानंतर तत्काळ सूर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाली. असाच दरवेळचा अनुभव आहे. त्यामुळे भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी तेलबियांमध्ये स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने प्रक्रियेपुरतेच मर्यादित न राहता सोयाबीन संशोधनावर लक्ष केंद्रित करावे. येत्या काळात सोपाने शेतकऱ्यांना सुधारित आणि बदलत्या वातावरणात तग धरणारे वाण उपलब्ध करून द्यावे. त्याची उत्पादकता देखील अधिक असेल यावर लक्ष केंद्रित करावे.
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT