Papaya Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Market : खानदेशात पपई आवक नीचांकी; दर स्थिर

Papaya Rate : खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत आहे. रमजान महिन्यामुळे पपईस उत्तरेकडे उठाव आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत आहे. रमजान महिन्यामुळे पपईस उत्तरेकडे उठाव आहे. परिणामी दरात वाढ झाली आहे. सध्या दर ९ ते १४ रुपये प्रतिकिलो, असा जागेवर मिळत आहे.

पपईची आवक डिसेंबर व जानेवारीत अधिक असते. फेब्रुवारीच्या मध्यापासून आवक कमी होते. मार्चमध्ये आवक निम्मी कमी होते. तर एप्रिलमध्ये आवकेत मोठी घट होते. कारण, स्थानिक किंवा मध्य क्षेत्रातील बाजारांत उष्णतेमुळे पपईस उठाव नसतो.

परंतु यंदा रमजान महिना या काळात आल्याने पपई दरात वाढ झाली. ही दरवाढ ६ मार्चपासून सुरू झाली. डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पपईचे दर थेट खरेदीत अडीच ते तीन रुपये प्रतिकिलो होते.

परंतु फेब्रुवारीच्या अखेरीस दरात सुधारणा सुरू झाली. मार्चमध्ये पपईला सरासरी १३ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळाला, तर किमान नऊ व कमाल १४ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.

उत्तर भारतात पाठवणूक

पपईची आवकही नीचांकी स्थितीत आहे. आवक जानेवारी व फेब्रुवारीत प्रतिदिन सरासरी ४० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी होती. मार्चच्या मध्यात आवक प्रतिदिन सरासरी १५ ट्रक एवढी झाली. सध्या प्रतिदिन १० ट्रक पपईची आवक खानदेशात होत आहे. पपईची पाठवणूक दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, काश्मीर आदी भागात केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: वादळी पावसाला पोषक हवामान; राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज कायम

Deen Dayal Upadhyay Awards: चार ग्रामपंचायतींना केंद्र सरकारचा ‘दीन दयाळ उपाध्याय’ पुरस्कार जाहीर

Maharashtra Rural Economy: ग्रामीण ‘एक्सपॅट इकॉनॉमी’

Pulses Import Issues: खाद्यतेलाप्रमाणेच कडधान्यांतही सरकारचे आत्मघातकी धोरण

Water Levels Drop: जळगाव जिल्ह्यातील धरणे निम्म्यावर

SCROLL FOR NEXT