Lemon Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Lemon Price Drop: मॉन्सूनपूर्व पावसामुळे लिंबू दरात गोणीमागे ६०० रुपयांची घसरण!

Pre-Monsoon Rain Hits Lemon Prices: मॉन्सूनपूर्व वातावरणातील बदल आणि शेतकऱ्यांची वेळेआधी तोडणी यामुळे लिंबाच्या दरात मोठी घट झाली आहे. मार्केट यार्डात लिंबाच्या गोणीमागे ५०० ते ६०० रुपयांची घसरण नोंदवली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: वाढत्या उन्हामुळे मागील काही दिवसांमध्ये मार्केट यार्डात कच्च्या आणि अपरिपक्व लिंबाची आवक वाढली होती. उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी असल्याने भाव जास्त मिळत होते. त्यामुळे वेळेआधीच तोडणी करून माल बाजारात शेतकरी पाठवत होत. परंतु अशा माल खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.

त्यातच आता वातावरणातील बदलाचा फटकाही मागणीवर झाला आहे. त्यामुळे आठवडाभरात लिंबाच्या भावात गोणीमागे ५०० ते ६०० रुपयांनी घट झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील लिंबाचे व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.

गेल्या आठवड्यापर्यंत मार्केटमध्ये दररोज सुमारे २ ते अडीच हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतून ही आवक होत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक भागातून आवक घटल्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद येथून आवक सुरू झाली होती, ही आवकही आता घटली आहे.

त्या भागातून दररोज अवघी २०० ते ३०० गोणी आवक होत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक भागातील शेतकऱ्यांकडून वेळेआधीच तोडणी करून हिरव्या रंगाची कच्चे लिंबू बाजारात पाठविण्यात येत आहेत. या लिंबाला नेहमीपेक्षा कमी भाव मिळत आहे. सध्या, बाजारात लिंबाच्या गोणीला दर्जानुसार २०० ते १ हजार रुपये भाव मिळत आहे. गोणीमध्ये १८ ते २० किलो माल असतो, मागणी घटल्यास भावात आणखी पट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उन्हाळ्यात वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांकडून जून, जुलै महिन्यांत परिपक्व होणाऱ्या लिंबाची तोडणी आताच होत आहे. या लिंबाला बाजारात कमी मागणी आहे. आता लिंबाची तोडणी झाल्यास पुढील महिना ते दोन महिन्यांच्या कालावधीत लिंबाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दर्जाहीन लिंबाला भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेआधी लिंबाची तोडणी करू नये.
रोहन जाधव, व्यापारी, मार्केट यार्ड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT