Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mango Rate : कॅनिंगच्या आंब्याचा दर स्थिर ठेवा

Mango Market : आंबा बागायतदारांची फसवणूक थांबवावी आणि दर स्थिर ठेवावे, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून केली जात आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कॅनिंगच्या आंब्याला प्रतिकिलो ४४ ते ४५ रुपये दर आहे. परंतु काही व्यापारी हेतुपुरस्सर कमी दर देत आहेत. आंबा बागायतदारांची फसवणूक थांबवावी आणि दर स्थिर ठेवावे, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून केली जात आहे.

जिल्ह्यातील आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातील बहुतांश आंबा कॅनिंगला पाठविला जातो. जिल्ह्यात सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस पडत असल्यामुळे आंबा बागायतदार आंबा कॅनिंगला पाठविताना दिसत आहेत.

कॅनिंगच्या आंब्याला सध्या प्रतिकिलो ४४ ते ४५ रुपये दर मिळत आहे. परंतु काही व्यापारी प्रतिकिलो ३३ रुपयांनी आंबा खरेदी करीत आहेत. प्रतिकिलो ११ ते १२ रुपये कमी दराने खरेदी केली जात असल्यामुळे आंबा बागायतदारांची मोठी फसवणूक होत आहे.

ही फसवणूक थांबविण्यात यावी आणि निश्चित असलेल्या दराने आंबा खरेदी करावी, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून केली जात आहे. तसेच पूर्वमोसमी पावसाच्या फटक्याने आता जिल्ह्यातील बहुतांशी भागातील आंबा अंतिम टप्प्यात आळा आहे.

कॅनिंगच्या आंब्याला प्रतिकिलो ४५ रुपये दर आहे. परंतु देवगडात वेगळा दर वेंगुर्ल्यात वेगळा दर असे प्रकार सुरू आहेत. व्यापाऱ्यांनी ४५ रुपयांनी आंबा खरेदी करावा, अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने जाब विचारावा लागेल.
प्रफुल्लचंद्र कुबल, आंबा बागायतदार, मातोंड, ता. वेंगुर्ला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strait of Hormuz Iran : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचा ताबा आणखी मजबूत होणार?; जहाजांकडून शुल्क आकारण्याचा प्रस्ताव

Energy Conservation Award: ऊर्जा संवर्धनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ‘हॅटट्रिक’

Maharashtra Rain Update: मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर पावसाचा 'येलो अलर्ट'

Natural Farming Training: निवासी प्रशिक्षणातून कृषी सखींना नैसर्गिक शेतीचे धडे

White Grub Control: हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला? जैविक नियंत्रणावर द्या भर

SCROLL FOR NEXT