Team Agrowon
उत्तम दर मिळण्याच्या आशेने आंबा काढणीची घाई करणे किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक रसायनाच्या साह्याने पिकविण्याचे प्रकार काही शेतकरी व व्यापारी मंडळी करत असतात.
या रसायनाच्या पुड्या बांधून आंब्यामध्ये ठेवल्या जातात. त्यातून बाहेर पडणाऱ्या ॲसिटिलिन वायूमुळे अगदी ३५ ते ४० तासांत हिरव्या आंब्याला फक्त वरून पिवळा रंग येतो. मात्र तो आतून पक्व असतोच असे नाही!
फळे वरून आकर्षक दिसत असली तरी आतून कच्ची, आंबट किंवा बेचव असतात. त्यात ही रसायने आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून, कर्करोगकारक आहेत.
नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा विशेषतः देठाजवळ थोडासा खड्डा पडलेला असून, बाजूचे खांदे वर आलेली असतात.
फळाची चोच सर्वसाधारणतः बोथट असते.
आंब्याला भरीव आकार आलेला दिसतो.
त्यावरील लेंटीसेलचे स्पॉटसुद्धा ठळक असतात.