Pre-Monsoon : पुणे विभागात धरणक्षेत्रात पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षाच

Pre-Monsoon Update : मेअखेरीस सर्वत्र भीषण पाणीटंचाईची समस्या
Pre-monsoon
Pre-monsoon Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : गेले काही दिवस पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणक्षेत्रात पावसाची प्रतीक्षाच असून, धरणांतील पाण्याच्या पातळीत विशेष वाढ झालेली नाही. ऐन मेअखेरीस सर्वत्र भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे.

सध्या पुणे, पिंपरी- चिंचवड शहरांसह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील १६ धरणांनी तळ गाठला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. जलसंपदा विभागाला धरणांमधील उपलब्ध पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे लागत आहे.

जिल्ह्यात पाच प्रमुख नद्या आणि २५ धरणे आहेत. या धरणांद्वारे पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहर तसेच जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची वाढलेली मागणी, पाणीचोरी, गळती यामुळे धरणांमधील पाणीसाठा संपत आला आहे. पिंपळगाव जोगे आणि नाझरे या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. उजनीतही कमी पाणीसाठा आहे.

Pre-monsoon
Pre-Monsoon Rain : पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरूच

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमध्ये मिळून एकूण ६.२७ टीएमसी म्हणजेच २१.५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पिंपळगाव जोगे, माणिकडोह येडगाव, वडज, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडिवळे, कासारसाई, टेमघर, गुंजवणी, नीरा देवघर, नाझरे आणि उजनी या धरणांनी तळ गाठला आहे. वाढत्या पाणीटंचाईमुळे प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत.


पावसाची हजेरी; पाणीसाठा ‘जैसे थे’
शहरासह जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. बुधवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील दोन ते तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. शहर आणि जिल्ह्यात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. मात्र, पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com