Jowar Bajri Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jowar Bajri Rate : बाजरीसह ज्वारीचे दर वधारले

टीम ॲग्रोवन

वाशी ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार (Mumbai APMC) समितीमधील घाऊक बाजारात बाजरी व ज्वारीच्या दरात (Jowar Bajri Rate) वाढ झाली आहे. बाजरीच्या दरात (Bajri Rate) गतवर्षीच्या तुलनेत आठ रुपयांनी तर ज्वारीचे दर (Jowar Rate) प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढले आहेत. सध्या गव्हाचे दर स्थिर आहेत. तांदळाचे दरही एक-दोन रुपयांनी वाढले आहेत. ज्वारी, बाजरीच्या दरात वाढ झाल्यामुळे भाकरी आता महागली आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये ३२ रुपये किलोने विकला जाणारा गहु हा यंदा त्‍याच किमतीत उपलब्‍ध आहे. दोन वर्षांपूर्वी गव्हाच्या किमतीत १० ते १५ रुपयांची वाढ झाली होती. रशिया युक्रेन युद्धानंतर मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात वाढली आहे. तर वाशी येथील एपीएमसीत येणारा गहू प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानहून येत असल्‍याचे व्यापारी लालजी भाई यांनी सांगितले.

गतवर्षी बाजरीचे दर प्रतिकिलो २२ रुपये होते, मात्र यंदा दरात आठ ते १० रुपयांची वाढ झाली असून दर्जानुसार ३० रुपये किलोने विकली जात आहे. सध्या बाजरीची आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये नवीन माल येण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजरीच्या दरात घसरण होईल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कांद्याला उठाव कमी

एपीएमसीत कांद्याची आवक सुरू असून उठाव नसल्याने भाव गडगडले आहे. बाजारात ३० ते ३५ रुपयांनी उपलब्ध असलेला जुना कांदा आता २५ व २८ रुपयांनी विक्री होत आहे. तर २० ते २२ रुपयांनी विकला जाणारा नवीन कांद्याचे दर १५ ते २० रुपयांनी कमी झाले आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एपीएमसीत नवीन कांद्याची आवक होते. सध्या नवीन कांद्याच्या २ ते ३ गाडी दाखल होत असल्‍या तरी जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. बुधवारी एपीएमसीत १०० गाड्यांची आवक झाली. पुणे, नाशिक, नगरमधून कांदा दाखल झाला आहे, तुलनेने उठाव नसल्‍याने दरात मोठी घसरण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT