Milk Collection
Milk Collection  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Milk Rate : दूध खरेदी-विक्री दरात एकसूत्रता आणणार

टीम ॲग्रोवन

पुणे : दूध विक्री दरात (Milk Rate) वाढ करताना ग्राहक किंमत (एमआरपी) रुपये ५४ पेक्षा जास्त नसावी. तसेच डीलर ते ग्राहकांना दिली जाणारी किंमत यामध्ये पाच रूपयांपेक्षा जास्त अंतर नसावे, यातून दरवाढीचा (Milk Rate Increase) भार ग्राहकांवर पडणार नाही. दूध खरेदी-विक्री दरात एकसूत्रतेचा अवलंब सर्वांनी करावा, असे धोरण राज्यभरातील खासगी तसेच सहकारी दूध संघाकडून एकमताने ठरविण्यात आले.

परराज्यातील दूग्ध व्यवसायिकांचे राज्यातील होणारे आक्रमण त्यातून दूध खरेदी विक्रीच्या दरावर होणारे परिणाम तसेच अनिष्ट स्पर्धा व इतर अडी-अडचणींबाबत राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज डेअरी येथे झाली.

या बैठकीत संघाचे अध्यक्ष मस्के, पुणे दूध उत्पादक संघाचे राहुल दिवेकर, सोनाईचे धैर्यशील माने, चितळे दूध समुहाचे श्रीपाद चितळे, रणजित सिंह देशमुख, किरीट मेहता, राजू सरगोळीकर, विलास नलावडे, संजय मिश्रा, मच्छिंद्र लंके, राजहंस, शिवामृत, दूध पंढरी, थोटे, स्फूर्ती, संतकृपा, कात्रज, ऊर्जा, पराग, गोविंद, नवनाथ, कन्हैय्या, कृष्णा, सुरुची, साने, श्री गणेशा इत्यादी सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी सदर धोरण ठरविण्यात आले. या प्रसंगी कात्रज संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी आभार मानले.

भेसळखोरांना रोखण्यासाठी पथक असावे

या वेळी राज्य सरकारने दूध उद्योगासाठी सर्वसमावेशक धोरण आणावे. यासाठी प्रयत्न करणे, शासन नियुक्त संयुक्त समितीच्या नियमितपणे बैठका व्हाव्यात. पनीरसह दुग्धजन्य पदार्थाच्या भेसळखोरांना रोखण्यासाठी संयुक्त फिरते पथक असावे, या मुद्यांवरही या बैठकीत धोरण सर्वानुमते ठरविण्यात आले. परराज्यातील दूग्ध व्यावसायिक त्यांच्या राज्यात दूध खरेदीसाठी कमी दर देऊन महाराष्ट्र राज्यात येऊन जादा दराने सोयीच्या ठिकाणाहून दूध खरेदी करतात, त्याचा परिणाम राज्यातील दूध व्यवसायावर होत आहे. दूध खरेदी व विक्री दरात सर्वत्र एकवाक्यता असावी, या मुद्यांवरही चर्चा झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT