Soya Meal  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soya Meal Export: भारताची सोयापेंड निर्यात वाढली; मोहरीपेंड निर्यात घटली

Market Update: भारताच्या सोयापेंड निर्यातीत वाढ झाली असून ती १८ लाख टनांवर पोहोचली आहे, तर मोहरीपेंड आणि एरंडी पेंड निर्यात घटली आहे. यंदा तेलबिया पेंड निर्यात ३६ लाख टनांवर स्थिरावली असून मागील वर्षीपेक्षा ९.४ टक्क्यांनी घसरली आहे, असे सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने स्पष्ट केले आहे.

Anil Jadhao 

Pune News: देशातून तेलबिया पेंडेची निर्यात यंदा घटली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ३६ लाख टन तेलबिया पेंड निर्यात झाली होती. मोहरी आणि एरंडी पेंड निर्यात कमी झाली. तर सोयाबीन पेंड निर्यात घटली आहे. सोयापेंड निर्यात जवळपास १८ लाख टन झाली, असे द साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने म्हटले आहे. 

एसईएने एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या १० महिन्यांतील काळात देशातून झालेल्या तेलबिया पेंडेचा अहवाल नुकता प्रसिध्द केला. मोहरी पेंड आणि एरंडी पेंड निर्यात कमी झाल्याने यंदा देशातून होणारी निर्यात जवळपास साडेनऊ टक्क्यांनी घटली आहे. भारतातून या १० महिन्यांमध्ये ३६ लाख टन तेलबिया पेंड निर्यात झाली.

मागील वर्षी याच काळातील निर्यात ३९ लाख टन होती. यंदा मोहरी पेंड निर्यात १५ लाख ४२ हजार टनांवर स्थिरावली आहे. मागील हंगामात याच काळातील निर्यात जवळपास १९ लाख टनांवर पोचली होती. तर एरंडी पेंड निर्यात सव्वातीन लाख टनांवरून कमी होऊन अडीच लाख टनांवर स्थिरावली आहे. 

एसईएचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितले की, भारताच्या मोहरी पेंडेचा मुख्य ग्राहक बांगलादेश आहे. मात्र भारत-बांगलादेश संबंधामुळे निर्यात मंदावली आहे. मागील काही महिन्यांपासून मोहरी पेंड निर्यातीवर परिणाम झाला आहे. भारताच्या तेलबिया पेंडेला दक्षिण कोरियाची चांगली मागणी राहीली. दक्षिण कोरियाने ६ लाख टन आयात केली. यात ४ लाख टन मोहरीपेंड तर एरंडी पेंड दीड लाख टन आणि सोयापेंडचा ४९ हजार टन समावेश आहे. 

व्हिएतनामला २ लाख टन निर्यात झाली होती. थायलंडने साडेतीन लाख टनांची आयात केली. बांगलादेशला सव्वासहा लाख टन तर इराणला दीड लाख टनांची निर्यात झाली. 

सोयापेंड निर्यात वाढली

भाराताची सोयापेंड निर्यात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या १० महिन्यांमध्ये जवळपास १८ लाख टन झाली. मागील वर्षी याच काळातील निर्यात १६ लाख टनांवर झाली होती. भारताच्या सोयापेंडला यंदा युरोपातील देशांची चांगली मागणी राहीली. त्यातही जर्मनी आणि फ्रान्सला झालेली निर्यात चांगली आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT