Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Marigold Flower Rate : झेंडूसह विविध फुलांच्या दरांत वाढ

Team Agrowon

Pune News : फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या विविध सणांपेकी एक आज (ता. १२) साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीनिमित्त विविध फुलांच्या मागणीत आणि दरांत वाढ झाली आहे. पुणे बाजार समितीत पुणे, सांगली, साताऱ्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाली. झेंडूला सरासरी ७० ते १०० आणि शेवंतीला २०० रुपयांपर्यंत दर मिळाले.

नवरात्रोत्सवानिमित्त गेल्या १० दिवस विविध फुलांच्या मागणीत, आवकेत तसेच दरांतही वाढ झाली होती. यामध्ये प्रामुख्याने झेंडू, शेवंती, गुलछडी, ॲस्टर हा फुलांना विशेष मागणी असल्याचे फुलांचे प्रसिद्ध आडतदार सागर भोसले यांनी सांगितले.

झेंडूची प्रामुख्याने आवक पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा आणि मराठवाड्यातील विविध गावांमधून झाली. मागील दहा दिवस झेंडू आणि शेवंतीचे दर टिकून होते. झेंडूमध्ये केशरी आणि पिवळ्या फुलांना मोठी मागणी होती. तर कोलकात्ता वाणाला चांगले दर मिळाल्याचे भोसले यांनी सांगितले.

फुलांचे किलोचे दर (रुपये)

झेंडू ५०-१२०, गुलछडी ४००-६००, बिजली १००-२००, ॲस्टर जुडी ४०-५०, सुट्टा १५०-३००, शेवंती १५०-३००

आमची २० एकर शेती असून, ऊस भाजीपाल्यासह वर्षभर झेंडूंचे पीक घेत असतो. प्रत्येक सणाच्या नियोजनानुसार १५ ते २० गुंठे झेंडूची लागवड असते. गणपती, दसरा, दिवाळी आणि मार्गशीर्ष महिन्यासाठी झेंडूची लागवड करतो. गणपतीमध्ये १५ गुंठ्यातील झेंडूच्या फुलांचे सव्वालाख उत्पन्न मिळाले. गणपतीपासून ७० ते १०० रुपये दर मिळत आहे. आज १३७ क्रेट आणले होते. सरासरी ७० रुपये दर मिळाला.
विशाल गवळी, नेर्ले, ता. करमाळा, जि. सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT