Maize, Chana and Wheat Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Chana Rabi Sowing : मक्याच्या लागवड मोठी वाढ; शेतकऱ्यांची हरभरा आणि गव्हालाही चांगली पसंती

Rabi Season : चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी यंदा गहू, हरभरा आणि मक्याला पसंती दिल्याचे दिसत आहे. गहू आणि मक्याची पेरणी सरासरी क्षेत्राच्या पुढे गेली. भाताची लागवड गेल्यावर्षीपेक्षा आघाडीवर पोचली मात्र सरासरीच्या तुलनेत कमीच आहे.

Anil Jadhao 

Pune News : चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी यंदा गहू, हरभरा आणि मक्याला पसंती दिल्याचे दिसत आहे. गहू आणि मक्याची पेरणी सरासरी क्षेत्राच्या पुढे गेली. भाताची लागवड गेल्यावर्षीपेक्षा आघाडीवर पोचली मात्र सरासरीच्या तुलनेत कमीच आहे. ज्वारी, मूग आणि उडदाचा पेराही कमी आहे. तर एकूण रब्बी लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत आघाडीवर आहे. लवकरच रब्बीची लागवड संपेल असे स्थिती आहे.

देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. देशात रब्बीचा पेरा ६३२ लाख हेक्टरवर पोचला. गेल्यावर्षी लागवड ६३१ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. म्हणजेच यंदाची १० जानेवारीपर्यंतची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. मात्र सरासरी क्षेत्र ६३५ लाख हेक्टरपेक्षा अजूनही ३ लाख हेक्टरने पिछाडीवर आहे. रब्बी लागवडीत आतापर्यंत गव्हाने गेल्यावर्षीची आणि सरासरी क्षेत्राची पातळी पार केली. मका लागवडही सरासरी आणि गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसत आहे. तर भात मात्र सरासरी क्षेत्रापेक्षा ४८ टक्क्यांनी कमी आहे.

मागच्या हंगामात देशात पाऊसमान कमी होते. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरणाचा अभाव होता. त्यामुळे अनेक पिकांची पेरणी केमी झाली होती. यंदा पाऊसमान चांगले असल्याने पेरणीला पोषक वातावरण आहे. देशात भाताचे सरासरी क्षेत्र ४२ लाख हेक्टर आहे. तर १० जानेवारीपर्यंत देशात २२ लाख हेक्टरवरच लागवड झाली. पण यंदाची लागवड गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत २१ लाख ५३ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. 

तेलबियांची लागवड गेल्यावर्षीपेक्षा पिछाडीवर आहे, मात्र सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त आहे. तेलबियांची लागवड १० जानेवारीपर्यंत ९७ लाख हेक्टरवर झाली. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत  १०२ लाख हेक्टरवर झाली होती. त्यातही मोहरीची लागवड ७ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यंदा ८८ लाख हेक्टरवर लागवड झाली. मात्र गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ९४ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. भूईमुग लागवड गेल्यावर्षीपेक्षा जास्त असून ३ लाख ६५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. 

गव्हाचा पेरा वाढला

देशात यंदा गव्हाचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा दीड टक्क्याने वाढला. तर सरासरी क्षेत्रापेक्षा लागवड अडीच टक्क्याने जास्त आहे. गेल्यावर्षी देशात ३१५ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. यंदा लागवड क्षेत्र ३२० लाख हेक्टरवर पोचले आहे. तर सरासरी क्षेत्र ३१२ लाख हेक्टर आहे. गव्हाला मागील दोन वर्षांपासून चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची गव्हाला पसंती दिसून येत आहे.  

हरभऱ्याला पसंती

रब्बी पेरणीत शेतकऱ्यांनी यंदा कडधान्यालाही काहीशी पसंती दिल्याचे दिसते. त्यातही हरभऱ्याकडे ओढा जास्त आहे. देशात १४० लाख हेक्टरवर कडधान्याची पेरणी झाली. गेल्यावर्षी १३९ लाख हेक्टर क्षेत्र होते. त्यातही हरभरा पेरणी आघाडीवर आहे. गेल्या हंगामात देशात जवळपास ९६ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होता, तो यंदा ९७ लाख हेक्टरवर दिसत आहे. मसूरची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा अद्यापही पिछाडीवर आहे. तसेच उडीद आणि मुगाची लागवडही गेल्यावर्षीपेक्षा कमी दिसत आहे. 

मक्याकडेही ओढा

भरडधान्याचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा काहीसा आघाडीवर दिसत आहे. भरडधान्याखाली १० जानेवारीपर्यंत ५३ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र होते. तर गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ५३ लाख हेक्टर होते. मक्याची लागवड मात्र गेल्यावर्षीपेक्षा आणि सरासरी क्षेत्रापेक्षा वाढली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र २२ लाख हेक्टर आहे. तर गेल्यावर्षी २० लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाची लागवड २२ लाख ३७ हजार हेक्टर आहे.

म्हणजेच यंदाची लागवड आतापर्यंत सरासरी क्षेत्रापेक्षा जवळपास दीड टक्क्याने आणि गेल्यावर्षीच्या लागवडीपेक्षा जवळपास १२ टक्क्यांनी जास्त आहे. ज्वारीची लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमी दिसते. गेल्यावर्षी ज्वारीची लागवड २५ लाख हेक्टरवर झाली होती. ती यंदा २३ लाख हेक्टरवर दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT