Gold Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Gold Rate : लग्नसराईमुळे सोने, चांदी दरात, मागणीत वाढ

Todays Gold Rate : दिवाळीनंतर आता लग्नसराईमुळे सोने, चांदीला मागणी वाढली आहे. दिवाळीच्या पर्वात सोने तेजीत होते.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : दिवाळीनंतर आता लग्नसराईमुळे सोने, चांदीला मागणी वाढली आहे. दिवाळीच्या पर्वात सोने तेजीत होते. आता लग्नसराई सुरू होताच सोने दरात पुन्हा तेजी आली आहे. चांदीही किलोला ७७ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

सोन्याचा भाव ६१ हजार ते ६१ हजार ३०० रुपये प्रतितोळा आणि चांदीचा भाव एक किलोला ७२ ते ७३ हजार रुपये असा दिवाळीच्या पर्वात होता. १० ते १६ नोव्हेंबर या काळात सोन्याची मागणी होती. परंतु दरात वाढ झाली नव्हती.

आता सोने, चांदीच्या दरात उसळी सुरू झाल्याचे दिसत आहे. तुलसी विवाहानंतर लग्नाचा धडाका सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली आहे. लग्नासाठी मणी मंगळसूत्र, बांगड्या, कानातील डूल, गळ्यातील चंद्रहार, नाकातील नथ, चांदीचे पैंजण, जोडवे यांना विशेष मागणी आहे, अशी माहिती सराफ बाजारातून मिळाली.

चांदी दरात सहा हजारांची वाढ

चांदी १२ ऑक्टोबरला ७१ हजार प्रतिकिलो होती. ३१ ऑक्टोबरला ती ७४ हजारांवर गेली. १४ नोव्हेंबरला चांदीचा दर ७१ हजारांपर्यंत खाली आला. सोमवारी (ता. २७) हाच भाव ७६ हजारांवर गेला. दीड महिन्यात चांदीने सहा हजार रुपयांची उसळी घेतली. सोन्याच्या भावात ३ हजार ८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

सोने-चांदी दर (जीएसटीविना) (दर रुपयांत - सोने प्रतितोळा, चांदी प्रतिकिलो)

तारीख...सोने...चांदी

२ ऑक्टोबर...५८ हजार ७००...७१ हजार

३१ ऑक्टोबर...६१ हजार ३००...७४ हजार

१० नोव्हेंबर...६१ हजार...७२ हजार

१४ नोव्हेंबर...६० हजार ३००...७१ हजार

१७ नोव्हेंबर...६१ हजार ३००...७५ हजार

२७ नोव्हेंबर...६२ हजार...७६ हजार

२९ नोव्हेंबर...६२ हजार ८००...७७ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

MRGS Scheme: ‘एमआरजीएस’ योजनेत पाच कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह

Freedom Of Religion Bill: धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ विधानसभेत सादर; मुस्लिम समाज लक्ष्य असल्याचा विरोधकांचा दावा

Sugar Factory Action: सोलापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर जप्तीचा प्रस्ताव

Millet Farming: कुरुलमध्ये राळा, वरई, भगरीचा प्रयोग,संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT