Mahua Flower Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Mahua Flower Price: मेळघाटात मोहफुलांना १०० रुपये किलोचा दर

Melghat Tribal Employment: मेळघाटात मोहफुलांचा हंगाम सुरू असून, स्थानिक आदिवासींना यातून चांगला रोजगार मिळत आहे. सध्या मोहफुलांना १०० रुपये प्रति किलो दर मिळत असून, अनेक कुटुंबे संकलनासाठी रात्रभर शेकोटी पेटवून थांबतात. मात्र, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका कायम आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: मेळघाटात हंगामी वनउपज हाच रोजगाराचा मुख्य स्रोत ठरतो. इतरवेळी रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. सध्या मोहफुलाचा हंगाम सुरू असल्याने दुर्गम मेळघाटात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.

दुर्गम आणि आदिवासी प्रवण असलेल्या मेळघाटात हंगामी शेतीकामे हाच रोजगार आणि उत्पन्नाचा स्रोत ठरतो. शेती कामे नसतील त्या वेळी वन उपजांचे संकलन करुन त्याच्या विक्रीतून आदिवासी कुटुंबीय आपल्या दैनंदिन गरजांसाठी लागणारा पैसा उभा करतात. उत्पन्नाचा पर्याय देखील नसल्यास इतर जिल्ह्यांत स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यासोबतच रोजगार हमी योजनेवरही अनेक जण काम करतात.

सध्या दुर्गम मेळघाटात रोजगार हमी योजनेचा पर्याय उपलब्ध असून, त्याच्या जोडीला मोहफुलांचा देखील हंगाम सुरू झाला आहे. मेळघाटातील आदिवासी बांधव होळी सण उत्साहात साजरा करतात. होळीची या भागात मोठी धूम राहते. त्याच काळात मोहफुलाचा हंगाम सुरू होतो तो सुमारे महिनाभर चालतो, असे सांगितले जाते. मोहफुलाचा हंगाम सुरू असल्याने या भागातून रोजगारानिमित्त स्थलांतर थांबले आहे.

मोहफुल संकलनाकरिता आदिवासी कुटुंबीय रात्रीच जागली (मुक्‍कामी) शेतात जातात. रात्रभर मोहफुलाच्या झाडाखाली शेकोटी पेटवत ठिय्या दिला जातो. मोहफुलांची चोरी रोखण्यासाठी हे केले जाते. त्यानंतर भल्या सकाळी मोहफुले संकलित करून घरी आणली जातात. तीन दिवस उन्हात वाळत घालण्यावर भर राहतो. यामुळे ती वाळत पक्‍की होतात आणि अशा कडक मोहफुलांनाच बाजारात मागणी राहते. सध्या मोहफुलांना प्रति किलो १०० रुपयांचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मोहफुलांची खरेदी होते.

संकलनात जोखीम अधिक

वाघांसह इतर हिंस्र प्राण्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रात्री मोहफुले संकलनासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचा हल्ला होण्याची अधिक शक्‍यता राहते. यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. यामध्ये अनेकांनी आपला जीवही गमावला आहे.

एका महिन्याचा हंगाम

१५ मार्च ते १५ एप्रिल असा सरासरी मोहफुलांचा हंगाम राहतो. एका झाडापासून सरासरी १२५ ते १५० किलो मोहफुल मिळतात. उत्तम प्रतीची मोहफुले असल्याने त्याला बाजारातही चांगली मागणी राहते. यातूनच हंगामी रोजगाराची निर्मिती होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT