Dragon Fruit Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dragon Fruit Rate : ड्रॅगन फ्रुटच्या दरात सुधारणा

सध्या ड्रॅगन फ्रुटला प्रति किलोस १२० ते १८० रुपये असा दर मिळत आहे. गत पंधरा ते वीस दिवसांपेक्षा दरात प्रति किलोस २० ते ३० रुपयांनी सुधारणा झाल्याने ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः राज्यात फळे बाजारपेठेत ड्रॅगन फ्रुटची आवक (Dragon Fruit Arrival) गेल्या आठवड्यापेक्षा घटली असून ड्रॅगन फ्रुटला मागणी (Dragon Fruit Demand) अधिक आहे. सध्या ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit Rate) प्रति किलोस १२० ते १८० रुपये असा दर मिळत आहे. गत पंधरा ते वीस दिवसांपेक्षा दरात प्रति किलोस २० ते ३० रुपयांनी सुधारणा झाल्याने ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत दुसरा बहार सुरू होईल, त्या दरम्यान, दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

राज्यात अलीकडच्या काळात ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढली असून सरासरी १ हजार टनांहून अधिक उत्पादन होते. ड्रॅगन फ्रुटला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत त्याची विक्री होत आहे. सध्या ड्रॅगन फ्रुटचा हंगाम सुरू झाला आहे. वास्तविक पाहता, जून, जुलै महिन्यात पाऊस असल्याने ड्रॅगन फ्रुटची काढणी थांबली होती. त्यामुळे एकाचवेळी बाजारपेठेत ड्रॅनग फ्रुटची आवक झाली होती. त्यामुळे ड्रॅगन फ्रुटला प्रति किलोस १०० ते १५० रुपये असा दर मिळाला होता. परंतु गतवर्षीपेक्षा हंगामाच्या प्रारंभी ड्रॅगन फ्रुटला चांगले दर मिळाले. सध्या ड्रॅगन फ्रुटला १२० ते १८० रुपये दर आहे.

ड्रॅगन फ्रुटचा हंगाम एक जूनपासून सुरू होतो. सर्वसाधारणपणे नोव्हेंबरअखेर ड्रॅगन फ्रुट बाजारपेठेत विक्रीस येते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रोजच्या आहारात ड्रॅगन फ्रुटचा वापर वाढला आहे. डॉक्टरांकडूनदेखील ड्रॅगन फ्रुट खाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे या फळास बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या बाजारात आवक कमी असल्याने दरात वाढ होत आहे. सध्या ड्रॅगन फ्रुटला पहिला बहार संपला आहे. आता दुसरा बहार येत्या आठवड्याभरात सुरू होईल. सध्या गौरी गणपती सण असल्यानेदेखील या फळाची मागणी वाढली असून या सणानिमित्त ड्रॅगन फ्रुटच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पांढरे ड्रॅगन फ्रुट ः १२० रुपये प्रति किलो

लाल ड्रॅगन फ्रुट ः १८० रुपये प्रति किलो

राज्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढते आहे. हे फळ आरोग्यास पोषक असल्याने मागणीतही वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. यंदा ड्रॅगन फ्रुटच्या दरात वाढ होण्याची शक्यताही आहे.
संभाजी कोडग, ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकरी जत, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT