Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : परभणीतील बाजारपेठांत कापूस दरात सुधारणा

Cotton Rate : जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमधील कापसाची आवक कमी झाली आहे. लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमधील कापसाची आवक कमी झाली आहे. लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली. मागील दोन दिवसांत कापसाच्या दरात क्विंटलमागे १५० ते ४५० रुपयांनी सुधारणा झाली आहे.

सोमवारी (ता. ३) मानवत बाजार समितीत कापसाच्या ११० ते १२० गाडी आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७४१५ रुपये तर सरासरी ७३०० रुपये दर मिळाले. सेलू बाजार समितीमध्ये कापसाला प्रतिक्विंटल किमान ६२५० ते कमाल ७४१० रुपये तर सरासरी ७३५० रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४३५ रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १) कापसाची २३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७३७५ रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी

(ता. ३०) कापसाची १६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७१९० रुपये तर सरासरी ७१०० रुपये दर मिळाले. बुधावारी (ता. २८) ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६९५० रुपये तर सरासरी ६८२५ रुपये दर मिळाले.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत मानवत बाजार समितीत कापसाची आवक कमी झाली. दरात चढउतार सुरूच आहे. किमान दर ६००० रुपयांवर स्थिर आहेत. कमाल दरात १५० ते ४०० रुपयांनी सुधारणा झाली. सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. १) कापसाची १६८९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४०५ ते कमाल ७३१० रुपये तर सरासरी ७२६० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. ३०) कापसाची १६८७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७१८० रुपये तर सरासरी ७१५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २८) कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ७१५५ रुपये तर सरासरी ७०४५ रुपये दर मिळाले. परभणी बाजार समितीतच्या टीएमसी मार्केट यार्डावर शनिवारी (ता. १) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७३०० ते कमाल ७४५० रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले.

किमान आठ हजार रुपये दराची अपेक्षा

परभणीतील बाजारपेठांत गेल्या काही आठवड्यांपासून कापसाचे कमाल दर साडेसात हजार रुपयांच्या आतच आहेत. किंचित सुधारणा झाल्यास आवक वाढते. आवक वाढल्यानंतर दर कमी होत आहेत.

आवक कमी झाल्यानंतर परत दरात थोडी सुधारणा होते, असे आजवरचे चित्र आहे. किमान आठ हजार रुपये दर मिळतील या अपेक्षेने अजूनही अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केलेली नाही. बाजारभावातील सुधारणा टिकून राहत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

SCROLL FOR NEXT